रायगड : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून महायुती सरकारमध्ये सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महायुतीत मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळाली. यातच अजित पवार गटाला काही पालकमंत्री पदं मिळालीत परंतु रायगड, नाशिक आणि इतर जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटात जोरदार चर्चा झाली. यातच आता रायगडचं पालकमंत्री पद अजित पवार गटाला मिळणार असं विधान कर्जतच्या सभेत अजित पवारांनी यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…“मंत्री छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी, सलग १२ मॅसेज पाठवून..,” राजकारण तापणार
पालकमंत्री पदावरून अजित पवारांनी सुरूवातीपासून नाराजी व्यक्त केली. यातच रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचं पालकमंत्री पद शिंदे गटाकडेच ठेवलं. त्यानंतर मंत्री उदय सामंताकडे दोन जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं. तर मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात यावं अशी मागणी अजित पवार गटाने केली होती.
हेही वाचा…मावळसाठी मीच उमेदवार असणार !श्रीरंग बारणेंनी जाहीर केली उमेदवारी, भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय ?
पालकमंत्री पदाबाबत अजित पवार म्हणाले की, सध्या पालकमंत्र्यांशिवाय उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्री पदही मिळावं यासाठी चर्चा करून निर्णय घेणार आहे. आम्ही राहिलेल्या मंत्र्यांबाबत देखील पालकमंत्री पद देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी इतर नेत्यांसोबत लवकरच चर्चा करणार. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद नाही. त्यामुळे अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळणार का ? की शिंदे गटातील पालकमंत्री पदाची आस लावून बसलेल्या आमदार भरतशेठ गोगावले यांना मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुळे आणि कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट निवडणुक लढवणार ? अजित पवारांनी स्पष्ट केलं, उमेदवार कोण ?
हेही वाचा…“त्याचे काय डोळे गेले आहेत का ?” एकेरी उल्लख करत जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल
हेही वाचा…लोकसभेच्या कोणत्या जागा लढविणार ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले…
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी १३० जेसीबी तयार, १४० एकरवर सभा, पोलिस तैनात, जालन्यातील सभा वादळी ठरणार का ?
हेही वाचा…शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, बावनकुळे, कराडांची उपोषणस्थळी भेट, म्हणाले…