जालना : मनोज जरांगे पाटलांची भव्य जाहिर सभा आज जालन्यात होत आहे. या सभेसाठी १३० जेसीबी स्वागतासाठी उभे असून तब्बल १४० एकरवर जाहीर सभा होत आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…शिरुरसाठी आंबेगाव ‘किंगमेकर’ : दोन दोस्त ठरवणार कोण होणार खासदार?
हे शक्तीप्रदर्शन नाही. आम्ही एकमेकांशी संवाद साधत आहोत. आम्ही आमच्या समाजातील लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र येत आहोत. त्याला यात जेसीबी आणि फुलच दिसत आहेत. त्याने आरक्षणही पहावं. त्याचे काय डोळे गेले आहेत का ? त्याने आरक्षण द्यायचंही बघावं, तिकडेही लक्ष द्यावं. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा…“..तर त्यांना भाजप तुकडे फेकणार नाही,” नितेश राणेंचा ‘बाडगा’ उल्लेख करत सुनील राऊतांची जहरी टिका
दरम्यान ३२ लाख लोकांना आरक्षण मिळालं. आयुष्याची भाकरी मिळाली म्हणून आनंदात जे जेसीबी, फुलं आणत आहेत. त्याला केवळ जेसीबी दिसत आहेत. ७० वर्षापासून आरक्षण नाही तेही दिसू दे. तो स्वत: आरक्षण खातो आणि आमचंही आरक्षण बुडाखाली घेऊन बसला आहे. त्याचे काय डोळे गेले आहेत का ? हे पोरं त्रास-वेदना सहन करत आहेत. त्याने तेही बघावं. असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांवर जहरी टिका केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेच्या कोणत्या जागा लढविणार ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले…
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी १३० जेसीबी तयार, १४० एकरवर सभा, पोलिस तैनात, जालन्यातील सभा वादळी ठरणार का ?
हेही वाचा…शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, बावनकुळे, कराडांची उपोषणस्थळी भेट, म्हणाले…
हेही वाचा…“मंत्री छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी, सलग १२ मॅसेज पाठवून..,” राजकारण तापणार
हेही वाचा…मावळसाठी मीच उमेदवार असणार !श्रीरंग बारणेंनी जाहीर केली उमेदवारी, भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय ?