जालना : मनोज जरांगे पाटलांची जालना येथे आज भव्य जाहीर सभा होत असून या सभेची जय्यत तयारी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. सभेमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दीड हजारहून अधिक पोलिसांसह ८ ड्रोन आणि १३ वॉच टॉवरद्वारे पोलिस रॅली आणि सभेवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. यातच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस अन् बीआरएसमध्ये काटे की टक्कर, शिंदेंनी भाजपसाठी प्रचार केला, भाजपला किती जागा ? एक्झिट पोल आला समोर
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यातच आता जालन्यात मनोज जरांगे पाटलांची १४० एकरवर जाहीर सभा होत असून यातील ४० एकर फक्त वाहनांच्या पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे. यातच सभेपुर्वी जरांगे पाटील यांची जालना शहरातून भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. यातच मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी १३० जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला समोर, भाजपला मोठा धक्का, काॅंग्रेसने उसंडी मारली
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली आहे. यातच जरांगे पाटलांच्या सभेवरही पावसाचं सावट असून याठिकाणी पाऊस आला आहे. त्यामुळे सभेच्या वेळी पाऊस येतो की नाही ?याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. जालन्यातील नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर ही सभा होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, बावनकुळे, कराडांची उपोषणस्थळी भेट, म्हणाले…
हेही वाचा…“मंत्री छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी, सलग १२ मॅसेज पाठवून..,” राजकारण तापणार
हेही वाचा…मावळसाठी मीच उमेदवार असणार !श्रीरंग बारणेंनी जाहीर केली उमेदवारी, भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय ?
हेही वाचा…शिरुरसाठी आंबेगाव ‘किंगमेकर’ : दोन दोस्त ठरवणार कोण होणार खासदार?
हेही वाचा…“..तर त्यांना भाजप तुकडे फेकणार नाही,” नितेश राणेंचा ‘बाडगा’ उल्लेख करत सुनील राऊतांची जहरी टिका