नवी दिल्ली : नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान पुर्ण झालं असून याचा निकाल येत्या ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच आता निवडणुकांच्या एक्झिट पोलनुसार धक्कादाय आकडेवारी समोर आली आहे. यातच तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक, नाशकातील दौरा भुजबळांनी अर्धवट का सोडला ? छगन भुजबळ म्हणाले..,
तेलंगणा राज्यात एकूण ११९ जागांसाठी मतदान पुर्ण झालं आहे. एक्झिट पोलनुसार तेलंगणात के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याठिकाणी काॅंग्रेस आणि बीआरएसमध्ये काटे की टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. यातच तेलंगणात एकूण ११९ जागापैंकी काॅंग्रेसला ४९ ते ५९ जागा बीआरएसला ४८ ते ५८ जागा तर भाजपच्या वाट्याला ०५ ते १० जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा…चिपळूनच्या पुलाचा भाग कोसळला, तोच कंत्राटदार, आदित्य ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एन डी टिव्ही च्या जन की बात या सर्व्हेनुसार तेलंगणात काॅंग्रेसला ४८ ते ६४, बीआरएसला ४० ते ५५ तर भाजपला ७ ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणात मात्र मातंग समाजाकडून भाजपला मोठ्या प्रमाणत समर्थन मिळालं आहे. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलं होतं. तर तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमति शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळे तेलंगणात भाजपला आता किती जागा मिळणार त्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ‘याठिकाणी’ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण,” कार्यक्रमाची जय्यत तयारी
दरम्यान, बीआरएस नेते आणि मुख्यमंत्री केसीआर यावेळी गजवेल आणि कामरेड्डी या दोन जागांवर निवडणुक लढविली होती. सध्या केसीरआर हे गजवले मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपनं गजवलेमधून ई. राजेंद्र आणि कामरेड्डीमधून वेकंट रमण रेड्डी यांना उमेदवाराी दिली होती. तर त्याचवेळी काॅंग्रेसकडून कामरेड्डीमधून प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. रेवंत रेड्डी कोडंगल मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला समोर, भाजपला मोठा धक्का, काॅंग्रेसने उसंडी मारली
हेही वाचा…“..त्यामुळे विनाकारण अजित पवार गटाकडून चुकीची माहिती अयोगासमोर मांडली जातेय,” शरद पवार गटाचा आरोप
हेही वाचा…“तर थू तुमच्या जिंदगानीवर”, प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“अजितदादा भेकड नाही तर मग याची उत्तरं द्या,” शरद पवार गटाचे अजित पवार गटाला ‘१०’ तिखट सवाल
हेही वाचा…संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट, तर्क वितर्कांना उधाण