नाशिक : अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ गेले असता त्यांना मराठा समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आला. ठिकठिकाणी उभे राहून छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवत गो बॅक च्या घोषणा दिल्या. यातच आता छगन भुजबळ यांनी राहिलेला दौरा अर्धवट सोडून दोन गावांमध्ये भेट न देताच परत फिरल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…“हिंदूच्या शोभायात्रेत सहभागी झाला म्हणून दलित युवकाची हत्या”,SIT मार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी
राजकारण करण्याची वेळ नाही तर लोकांना धीर देण्याची गरज आहे. लोकांचे अश्रु पुसून त्यांना अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे. यामध्ये पक्ष बाजूला ठेऊन सहभागी होण्याची वेळ आहे. यातच काही पाच पंचवीस लोक गोळा होऊन आले तर विरोध झाला विरोध झाला असं म्हणतात. परंतु या मतदारसंघात ३ लाख लोक असून यातले किती लोक होते.? काही लोक कोपरगाव, काही इकडचे तिकडचे आणले गेले. काहीही संबंध नसलेले लोक होते. यात राजकीय नेत्यांना विरोध करणारे, त्यांना आमदाराकीची पुढची स्वप्न पडताहेत तीच होती. असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
हेही वाचा…मोठी बातमी..! ललित पाटील प्रकरणाबाबत ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चौकशीचा बडगा
दरम्यान, सर्व ठिकाणी अगदी शांततेच पाहणी दौरा झाला आहे. लोक ढसाढसा रडत होती. यातली बरीच मंडळी ही मराठा समाजाची होती. पाच पाच वर्षाचं नुकसान झालं आहे. लाखो रूपयांचं खर्ज वाढलेलं आहे. ती लोक आता पुन्हा उभं राहू शकत नाहीत. कांद्याचं एका एका व्यक्तीचं नुकसान पन्नास लाख रूपयाचं झालं आहे. सगळे कांदे संपलेले आहे. काही द्राक्षचं बाग विकले गेले होते. अशा अवकाळी पावसाचा परिणाम सर्वांवरच होतो. त्यांना मदत करण्याची गरज आहे. असंही छगन भुजबळ म्हणाले. यातच आता शहापुरला उपोषण सोडण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर कर्जत येथे पक्षाचं अधिवेशन सुरू आहे. त्याला हजेरी लावणार आहे. असंही भुजबळ यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…चिपळूनच्या पुलाचा भाग कोसळला, तोच कंत्राटदार, आदित्य ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ‘याठिकाणी’ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण,” कार्यक्रमाची जय्यत तयारी
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींची गाडी राऊत बंधूंनीच फोडली, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
हेही वाचा…भुजबळांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे, स्वत: च्याच मतदारसंघात ‘भुजबळ गो बॅंक’च्या घोषणा, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…राष्ट्रपतीचा शनिशिंगणापुर दौरा, अन् त्याच देवाच्या मंदिरात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार, उपोषणाचा दिला इशारा