पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ससून रूग्णालयातील डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रविंद्र धंगेकर यांनी आयुक्तलयाच्या समोर ठिय्या आंदोलन दिलंय. त्यानंतर आता पोलिसांनी ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा…“जाती जातीत भांडण करणाऱ्या नेत्यांमध्येच भांडणं, तीन पक्षांचा तमाशा”, यशोमती ठाकूर यांनी डिवचलं
पुणे पोलिसांकडून ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत ससून रूग्णालयातील १६ नंबर वॉर्डमधील १३ जणांची चौकशी करण्यात आली असून कैद्यांच्या वॉर्डमध्ये ३ शिप्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. विशेष करून १६ वॉर्डमध्ये ललित पाटीलवर उपचार सुर होते. याच संदर्भात डॉक्टरांसह नर्स आणि वॉर्ड बॉय यांची चौकशी केली गेली आहे.
हेही वाचा…सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, जंयत पाटलांनी केली घोषणा
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सातत्याने दोन महिने डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करावी अशी मागणी रविंद्र धंगेकर करीत आहे. ९ नऊ महिने ससून रूग्णालयात ललित पाटील पंचतारांकित सेवा घेत होता. अन् नऊ महिने त्यांनी तिथे अंमली पदार्थ देखिल विकेले आहेत. याच हाकेच्या अंतरावर बन गार्डन पोलिस स्टेशन आणि आयुक्तालय आहे. ज्या पद्धतीने ललित पाटीलचे लाड डॉ. संजीवर ठाकुर आणि काही पोलिस अधिकारी पुरवत होते. कालच काही पोलिसांना अटक केली आहे. मुळ मुद्दा डॉ. संजीवर ठाकुर यांना अटक करण्यात यावी,असे पत्र आयुक्ताला देण्यात आलं होतं. त्याच संदर्भात आजपासून आंदोलनाला सुरूवात केली असल्याचं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…अद्वय हिरेंनंतर बंधू अपुर्व हिरेंच्याही विरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…वाद पेटला..! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…रविकांत तुपकरांसमोर राज्य सरकार झुकलं, ७० ते ८० टक्के मागण्या मान्य, १५ दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…“मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यावाचून आता देशातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही”
हेही वाचा…ललित पाटील कुणाला हप्ते देत होता? 40 पोलिस, काही नेते, सुषमा अंधारेंच्या हाती लागलं ‘ते’ पत्र