मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आज सकाळी त्यांनी राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. यातच आता त्यांच्या भांडूप येथील घराच्या खाली त्यांच्या गाड्यांची तोडफोड काही अज्ञातांकडून करण्यात आल्याने ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली, एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
एकनाथ शिंदे यांचा हिंदुह्यदयसम्राट उल्लेख केल्याने दत्ता दळवी यांनी शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलिस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली अन् कोर्टाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा…“नालायकांनो..! हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे”, ठाकरे अन् शिंदे गटातला वाद पेटला
दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर टिका केल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी दत्ता दळवी यांची भांडुप येथील गाडी फोडली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. यातच आता या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यातच दत्ता दळवींच्या समर्थनार्थ ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रविकांत तुपकरांसमोर राज्य सरकार झुकलं, ७० ते ८० टक्के मागण्या मान्य, १५ दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…“मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यावाचून आता देशातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही”
हेही वाचा…ललित पाटील कुणाला हप्ते देत होता? 40 पोलिस, काही नेते, सुषमा अंधारेंच्या हाती लागलं ‘ते’ पत्र
हेही वाचा…“जाती जातीत भांडण करणाऱ्या नेत्यांमध्येच भांडणं, तीन पक्षांचा तमाशा”, यशोमती ठाकूर यांनी डिवचलं
हेही वाचा…सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, जंयत पाटलांनी केली घोषणा