मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. यातच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यासंदर्भात अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं ?
या बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते.
हेही वाचा…अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना फक्त दहा लाखांची मदत, सरकारची शहीदांप्रती अनास्था, वडेट्टीवारांची टिका
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यातच अवकाळीगस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय. तसेच झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. यामधून झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन
तर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान सुरू करण्यात येणार असून यामाध्यमातून शाळांचे मूल्यांकन केलं जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा असणार आहे. तर मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचसोबत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली आहे. त्याचबरोबर औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. तसेच ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३’ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्यात येणार आहे. यातच शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय.
#नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज #विधानसभा आणि #विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
विधानभवनात आयोजित बैठकीस विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar , विधान परिषद उपसभापती डॉ.… pic.twitter.com/WJLhaW0PTK— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“नालायकांनो..! हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे”, ठाकरे अन् शिंदे गटातला वाद पेटला
हेही वाचा…राहुल नार्वेकरांचा मोठा कस लागणार ? सकाळी अधिवेशन तर दुपारी शिवसेना अपात्र याचिकेवर सुनावणी
हेही वाचा…“बीडच्या जाळपोळ घटनामागे राजकीय शक्तीशाली व्यक्तीचा हात”, रोहित पवारांचा आरोप नेमका कुणावर ?
हेही वाचा…“भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडावी,” कॅबिनेट मंत्र्यांनी भुजबळांना सुनावलं
हेही वाचा…“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?” सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल