ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्ता दळवी यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापल्याप्रकरणी त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता ठाकरे गट अधिकच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंनी तेलंगणाच्या लोकांना घातली साद, म्हणाले..,
एकनाथ शिंदेंचा हिंदुह्यदयसम्राट म्हणून उल्लेख केल्यानंतर दत्ता दळवी यांनी भांडुप येथील एका कार्यक्रमात शिंदेंवर अपशब्द वापरला होता. त्यानंतर दत्ता दळवी यांच्यावर शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलिस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा…अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडवली दैना, ठाकरे गट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, यादी आली
दरम्यान, दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊतांनी देखील भांडूप येथील पोलिस स्टेशनच्या बाहेर येत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यातच आता दत्ता दळवी यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर ठाकरे गट आगामी दिवसात काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना फक्त दहा लाखांची मदत, सरकारची शहीदांप्रती अनास्था, वडेट्टीवारांची टिका
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्याबद्दल ‘तो’ शब्द वापरल्याने ठाकरे गटाच्या नेत्याला अटक, शिवसैनिक आक्रमक, राऊतांनी केली जोरदार टिका
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ‘या’ माजी महापौर नेत्याला पोलिसांनी घरातून केली अटक, राजकारण पेटणार
हेही वाचा…शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना आवाहन, पत्राद्वारे केली ‘ही’ मोठी मागणी