नवी दिल्ली : तेलंगणा राज्यातील विधानसबा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आदिलाबाद मतदारसंघाचे उमेदवार पायल शंकर यांच्यासाठी बेला शहरात प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. तसेच पायल शंकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी मतदारांना साद घातली.
हेही वाचा…“विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे”, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप
बेला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरूवातीला एकनाथ शिंदे नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार प्रविण दरेकर, आदिलाबादचे भाजपचे उमेदवार पायल शंकर तसेच शिवसेना आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा…“तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ?” उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. मात्र काँग्रेस आणि बीआरएसची मात्र भ्रष्टाचार हीच ओळख असल्याने येत्या निवडणुकीत बीआरएसची गाडी कायमची भंगारात जाऊ द्या. तसेच बीआरएसचा कारभार पाहता त्यांना ‘व्हीआरएस’ देऊन आता घरी पाठवण्याची वेळ आली असल्याचे सांगत या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरगोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
दरम्यान, देशात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार अस्तित्वात आल्यास त्याचा राज्याच्या विकासासाठी मोठा फायदा होतो. महाराष्ट्रात आम्ही घडवलेल्या बदलानंतर राज्यातील विकासकामांचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. असंही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडवली दैना, ठाकरे गट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, यादी आली
हेही वाचा…मावळात पेच वाढला, महायुतीच्या तिन्हीही नेत्यांचा जागेवर दावा, ठाकरे फायदा उचलणार ?
हेही वाचा…“शरद पवार पावसात भिजले हा 2024 साठी शुभ शकुन”, महाराष्ट्राचं चित्र पुन्हा बदलणार का ?
हेही वाचा…“आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला देण्यात यावे”, बिचुकलेंची मागणी, कार्यकर्त्यांनी थेट दुग्धाभिषेक घातला
हेही वाचा…“पण तुम्ही डबल इंजिनाची गाडी गाळात घातली”, चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टिका