मुंबई : राज्य वाऱ्यावर पडलं असताना एक फुल दोन हाफ, दुसरे दोन हाफ कुठे आहेत, काही कल्पना नाही. असंविधानिक मुख्यमंत्री स्वत: चं घर सोडून दुसऱ्याची घरं धुंडाळतात. स्वत: च घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“मोदींशी महात्मा गांधींशी तुलना, राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला”, म्हणाले..
आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अगदी तुम्हालाही नाही. आमचं सरकार रयतेचं कल्याण आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. त्यामुळेच ट्रिपल इंजिन सरकार असूनही आमची गाडी व्यवस्थित चालली आहे, मात्र डबल इंजिनाची गाडी तुम्ही गाळात घातली. आम्ही राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. म्हणूनच सुरूवातीला ४० तालुक्यांपुरती असलेली दुष्काळाची व्याप्ती तातडीने कार्यवाही करत आणकी काही तालुक्यांतील १०२१ महुसील मंडळांपर्यत वाढवली असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.
हेही वाचा…“पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून सुपारी देऊन पाठवलं होतं, मग..,”सत्तेतून का बाहेर पडलो? तटकरेंनी दिलं उत्तर
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आताही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कटिब्ध आहे. तुम्ही सत्ता गमावल्यांच्या दु: खाचं उट्टं काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांदा वापरू नका. असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या पंचतारांकीत शेती माझ्या गरीब शेतकऱ्याला ही मिळो, ही मी ईश्वरचरणी प्राथर्ना करतो. रामलल्लाच्या दर्शनापेक्षा तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार ? असा टोलाही ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
उद्धवजी…..@uddhavthackeray
आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही.आमचं सरकारच रयतेचं कल्याण आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे त्यामुळेच
ट्रिपल इंजिन सरकार असूनही आमची गाडी व्यवस्थित चाललीय आणि तुम्ही मात्र डबल इंजिनाची गाडी गाळात घातली…आम्ही…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे”, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप
हेही वाचा…“तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ?” उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला टोला
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
हेही वाचा…“भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा, महाराष्ट्रात आम्ही निवडणुकांची वाट बघतोय,”
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं