पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार तापवला जात आहे. यातच मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी जरांगे पाटलांच्या जोरदार सभा होतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर
गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात रोहित पवारांना टॅग करून असं म्हटलंय की, तुमच्या माहिती करता स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली आहे. पण त्यावर घाव घालणारे सुर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी गरिब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच शरद पवार होते. असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. त्यावरून आता पडळकरांवर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला
दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक घटकांवर आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या अन् त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.
तुमच्या माहिती करता @RRPSpeaks स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली. पण त्यावर घाव घालणारे सुर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि मा.@Dev_Fadnavis यांनी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच @PawarSpeaks आहेत. pic.twitter.com/VvY9CBuB0D
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींशी महात्मा गांधींशी तुलना, राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला”, म्हणाले..
हेही वाचा…“पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून सुपारी देऊन पाठवलं होतं, मग..,”सत्तेतून का बाहेर पडलो? तटकरेंनी दिलं उत्तर
हेही वाचा…“ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?” राऊतांनी नार्वेकरांना डिवचलं
हेही वाचा…रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली, मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयावर कब्जा करणार ?
हेही वाचा…तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा, ‘हा’ माजी मंत्री मुख्य आरोपी, आज निकाल लागणार