नागपूर : नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावर आज २८ नोव्हेंबरला निर्णय होणार आहे. तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी केला असल्याचा आरोप ओमप्रकाश कांबळे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला. यातच आता तब्बल २१ वर्षानंतर आज या प्रकरणाचा निकाल लागणार असून याकडे सगळ्याचं लक्ष आहे.
हेही वाचा…“..तरच राज्यातील सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान, राजकीय हालचाली वाढल्या
काॅंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी असलेल्या होम ट्रेड घोटाळा २००२ मध्ये उघडकीस आला. यामध्ये सुनील केदार यांच्यासह पवनराजे निंबाळकर, यांच्यासह अनेक राजकारण्यांची नावं यात होती. २३ नोव्हेंबरला २००२ ला केदार यांच्यावर या प्रकरणाबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले. कोलकात्याचा दलाल संजय अग्रवालच्या मदतीने जिल्हा सहकारी बॅंकतले पैसे पूर्वोत्तर राज्यातल्या रोख्यांत गुंतवले, त्या बदल्यात सुनील केदार यांच्यासह निंबाळकर यांना कमिशन मिळाल्याचा आरोप करण्यात आला.
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका
दरम्यान, या प्रकरणानंतर मध्यंतरी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यातच आता आज या प्रकरणाचा निकाल लागणार असून निकाल सकारात्मक येणार अशी आशा याचिका कर्ते ओमप्रकाश कांबळे यांनी केला आहे. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पुरकर यांच्या समक्ष खटल्याची अंतिम सुनावणी पुर्ण झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला
हेही वाचा…पक्षाच्या एकनिष्ठ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांनी जाहीर केलं नाव
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताला नाही तर जगाला गरज”, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान
हेही वाचा…शिंदे समिती बरखास्त करण्याची भुजबळांची मागणी, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..