बीड : राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. कपीलधार येथे धर्मसभेसाठी आले असता दिपक केसरकर यांना शिक्षक भरतीवरून काही तरूणांनी घेराव घातला. यावेळी शिक्षक भरतीवरून प्रश्न विचारताच केसरकर संतापले अन् तुमची माहिती घेऊन तुम्हाला अपात्र करू, अशी थेट धमकीच त्यांनी तरूणांना दिला. यावरून आता दिपक केसरकर यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा
सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार ५ वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुलींना श्रद्धा आणि सबुरी शिकवताय. प्रत्येकाला नोकरी ही अत्यंत महत्वाची आणि गरजेची असते. तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील केसरकर साहेब. जनतेला उत्तर देणं हे तुमचं काम आहे. ही अरेरावीची भाषा तुमच्या घरात चालत असेल. पण महाराष्ट्राची जनता अशी दादागिरी खपवून घेणार नाही. असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“शिंदे समितीचं कामं संपलंय, आता शिंदे समिती बरखास्त करा,” छगन भुजबळांची मोठी मागणी
राज्यात मागील काही वर्षापासून अनेक विभागातील भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यावरून बीड येथील कार्यक्रमाच्या वेळी दिपक केसरकर आले असता त्यांना काही तरूणांनी घेराव घातला. यावेळी भरती प्रक्रियेतून बाद करण्याचा नवीन कायदा केला आहे का ? असा सवाल केल्यानंतर दिपक केसरकर यांनी तरूणांवर संताप व्यक्त केला आहे. यावरून तुमची माहिती घेऊन तुम्हाला अपात्र करू, असा थेट इशाराच दिपक केसरकर यांनी भावी शिक्षिकेला दिला. त्यावरून आता राज्यातील वर्तुळातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा…“सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?” शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, आता या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टिका करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरा, असं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात.
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणाबाबत धंगेकर पुन्हा आक्रमक, बुधवारपासून करणार ठिय्या आंदोलन
हेही वाचा…सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या थरारक प्रवासाची कहाणी, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांनी आदिवासींची संघर्ष यात्रा रोखली, त्यानंतर ठाण्यातच दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…“साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक”, शरद पवारांची पावसातली सभा पुन्हा चर्चेत
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं..,” शिक्षणमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळेंची टिका