पुणे : मराठवाड्यातील निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरूवातीला शिंदे समितीला देण्यात आलं होतं. यासंदर्भात काही कागदपत्रांची तपासणी करण्याची शिंदेंची नेमणूक केली. याबाबत मला विचारण्यात आल्यानंतर त्याला होकार दिला. सुरूवातीला पाच हजार लोकांच्या नोंदी सापडल्या. त्यानंतर साडेअकरा हजार, त्यानंतर वाढत वाढत जाऊन या नोंदी वाढत गेल्या. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात दिसून आलं. त्यानंतर आता मराठवाड्यातील काम संपलेलं आहे. इतर ठिकाणी देखील काम संपत आलं आहे. त्यामुळे आता शिंदे समिती बरखास्त करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
हेही वाचा…अबब… तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड! मोशी येथील देशी गोवंश व अश्व प्रदर्शनाला तुफान गर्दी
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला आमचा विरोध आहे. याची कायद्यात देखील तरतुद नाही, परंतु जे लोक संविधानाच्या कायद्यात बसतात. त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मराठवाड्यात निजामकालीन वंशवळ तपासून त्यांची नोंद असेल तर ते कुणबी झालेत. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत. त्यांना ओबीसीत घ्या. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…दैवत म्हणून शरद पवार यांचा अपमान का करताय? जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना सुनावलं
दरम्यान, प्रकाश शेंडगे यांच्याकडे काही कागदपत्र पाठविली आहेत. यामध्ये पुर्वी ताकाने वशंवळी लिहिल्या जात होत्या. आता पेनाने कुणबी अशी जात लिहिली जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. मुळात कुणबी असेल तर त्यांनी निश्चितपणे घ्यावे, शरद पवारांच्या वेळी मंडल आयोग लागू झाला. तेव्हा जाती होत्या, आता त्यात खुप वाढल्या आहेत. यातच आताच्या जातीत खाडाखोड केली जात असल्याचा आरोपही छगन भुजबळांनी लावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?” शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते,” थेट भुजबळांच्या गाडीजवळ गाडी लावत दिला इशारा, वातावरण चिघळलं
हेही वाचा…हातपाय तोडण्याची भाषा, ओबीसी विरूद्ध मराठा संघर्ष पेटतोय, बच्चू कडूंनी दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणावरून विविध समाजातील संघर्ष टाळायचा असेल तर..,” विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला ? शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप, राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर