पुणे : अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेकी प्रकरणात मुख्य आरोपी ऋषीकेश बदरेनी याच्यासह तीन आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तूल देखील जप्त केला आहे. यातच आता भाजप नेते नितेश राणे यांनी ऋषीकेश बदरेनी याचा शरद पवार यांच्यासोबतच फोटो ट्विट करून दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात ? असा सवाल केला आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
हेही वाचा…पंकजा मुंडेंवर खरंच अन्याय झाला आहे का ? शिंदे गटाच्या दाव्यानंतर भाजपकडून स्पष्टीकरण
ऋषिकेश बदरेनी याचा शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट करून भाजप आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यातच त्यांनी असा दावा केला आहे की, अंतरवाली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी ऋषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलिसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला ? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असा सवाल देखील नितेश राणे यांनी केला आहे.
हेही वाचा…“मुस्लिम महिलांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केलं, त्यामुळे २०२४ ला मोदीच येणार”
दरम्यान, नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोवरून केलेले आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. शरद पवारांसोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करून साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे. असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.
हेही वाचा…शिंदेंचा गड ठाकरेंकडून उद्धवस्त, २५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश
यातच जयंत पाटील यांनी ऋषीकेश बेद्रे याचे अजित पवार, नितेश राणे आणि भाजपच्या इतर नेत्यांसोबतचे फोटोही ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत. म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले, असे म्हणायचे का? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अबब… तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड! मोशी येथील देशी गोवंश व अश्व प्रदर्शनाला तुफान गर्दी
हेही वाचा…दैवत म्हणून शरद पवार यांचा अपमान का करताय? जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना सुनावलं
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कार्यकर्त्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
हेही वाचा…भाजपचे खासदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जुंपली, पाणी प्रश्नावरून भाजपचा खासदार खासदारकीचा राजीनामा देणार ?
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक, कार्यकर्ते आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर दिला ठिय्या आंदोलन