मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि शिंदेंची साथ सोडत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपच्या माजी महिला शहराध्यक्षा ज्योती पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. आज मातोश्रीवर तब्बल २५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय.
हेही वाचा…“दादासमोर नाक उचलून ,धाकुटी विचारे, तू कुठं काय केलंस?”, रूपाली चाकरणकरांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचा गड मानला जाणाऱ्या ठाणे, पालघर मध्ये सत्ताधारी पक्षाला खिंडार पाडले आहे. यावेळी लढणारे सैन्य माझ्यासोबत असल्याने राजकारणातील गद्दारांना गाडायला मला वेळ लागणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला.मी जास्त बोलत नाही. बोललो तर भाषण करावे लागेल. असं ठाकरेंनी म्हटलंय.
हेही वाचा…“२०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही,” सुळेंच्या टिकेला अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..
पालघर, ठाण्यातील लोकांनी पक्षात प्रवेश केला आहे. असे दृश्य दुर्मिळ आहे. कारण सत्ताधारी पक्षाकडे लोक जात असतात. आज आपल्याकडे लोक येतात. या देशात नव्हे जगात हिंदू ह्यदय सम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आता ही उपाधीही चोरायला बघाताहेत. या लोकांना राजकारणात गाडण्यासाठी तुम्ही सगळे सोबत येत आहेत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…प्रवीण दरेकरांची ‘राज्य सरकार समन्वयक’ म्हणून निवड, ‘मकाऊचा’ उल्लेख करत बावनकुळेंवर रोहित पवारांची टिका
दरम्यान, ज्योती पाटील यांना भाजपकडून सातत्याने डावलण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांनी अनेक कार्यक्रम राबवून पक्षाची ताकद वाढवली, पण शेवटच्या टप्प्यात त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. दिवा भाजपमध्ये दोन मंडल अध्यक्ष पद सोडून गेल्यानंतर ५०० महिलांना सोबत घेऊन आलेल्या ज्योती पाटील यांनी वर्षभर विविध उपक्रम व पक्षाचे काम केल्यानंतरही नव्या कार्यकारिणीत संधी देण्यात आली नाही. यातच दुसऱ्यांदा त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्ते देखील नाराज होते.
READ ALSO :
हेही वाचा…ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला, भुजबळांची होणार ‘या’ ठिकाणी जंगी सभा, रॅलीचंही आयोजन
हेही वाचा…“पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई”, सुळेंवर टिका अन् रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…राजस्थानच्या १९९ विधानसभा जागांसाठी मतदान सुरू, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कार
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करणारा मुख्य आरोपी अटकेत, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“..तर आगामी निवडणूकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन”, कोणी फोडली डरकाळी ?