मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊतील कॅसिनोतील फोटोमुळे चर्चेत आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंवर आरोप केले होते. यातच आता बावनकुळे यांनी महाराष्ट्रात येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. यातच आता त्यांनी भाजपचे राज्य सरकार समन्वयक पदी म्हणून प्रवीण दरेकर यांची नियुक्ती केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे,” जरांगे पाटलांचं भुजबळांना आवाहन
मकाऊला जाऊन पक्ष आणि सरकार समन्वयक पदाचा नवीन डाव आपण शिकून आलात का ? कंत्राटी भरती रद्द झाल्याने आपल्या सहकाऱ्यांचे नुकसान होऊन त्यांची ओढवलेली नाराजी दुर करण्याकरता अशी नवी पद्धत महाराष्ट्रात आणणे योग्य नाही. अशी नवी पद्धत आणून चीनप्रमाणे जनतेपेक्षा-सरकारपेक्षा वरचढ करण्याचा आपला इरादा तर नाही ना ? असा खोचक सवाल रोहित पवारांनी केला आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका
समन्वय साधायचाच असेल तर राज्यातील दुष्काळामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी, शासकीय पद भरतीसाठी, बेरोजगार तरूणांसाठी, महिला सुरक्षेसाठी, राज्यात उद्योग आणण्यासाठी सरकारशी समन्वय साधून पाठपुरावा करा, किमान सर्वसामान्यांचे आशिर्वाद तरी लागतील असा टोलाही रोहित पवारांनी बावनकुळेंना लगावला.
बावनकुळे साहेब,#मकाऊला जाऊन ‘पक्ष आणि सरकार समन्वयक’ पदाचा नवीन ‘डाव’ आपण शिकून आलात का ? #कंत्राटी भरती रद्द झाल्याने आपल्या सहकाऱ्यांचे नुकसान होऊन त्यांची ओढवलेली नाराजी दूर करण्याकरता अशी नवी पद्धत महाराष्ट्रात आणणे योग्य नाही.अशी नवी पद्धत आणून चीनप्रमाणे… https://t.co/AypMAPmupA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाण्यात भाजपला मोठा धक्का, ‘या’ माजी महिला शहर अध्यक्षा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
हेही वाचा…अंतरवाली सराटीत दगडफेकी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पोलिसांनी केली तिघांना अटक
हेही वाचा…“राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं?” निवडणुक आयोगात सवाल, अजित पवार गटाने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
हेही वाचा…कार्यक्रमात तरुणीवर पैसे उधळणे अजित पवार गटाच्या सभापतीला भोवलं, सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून रचला कट, निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद