भंडारा : लावणीच्या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या तरूणीवर पैसे उधळण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष करून अजित पवार गटाचे सभापतींनीच हा प्रकार केल्याने एकच चर्चा सुरू आहे. हा प्रकार उघड होताच पोलिसांनी या प्रकरणी सभापतीसह ७ जणांवर गुन्हे दाखल केला आहे.
हेही वाचा…“आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते”
बीड सीतेपार इथं लावणीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नृत्यांगणेवर पैसे उधळण्याने मोहाडी पंचायत समितीचे सभापती आणि शौकिंनाना चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिरोज गजभिये, विक्की गायधने, आशिष देशकर, दुर्योधन बावनकुळे, विक्की जिभकाटे, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सभापती रितेश वासनिक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा…“खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप”
दरम्यान, गावात कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावली असतानाही तसेच शासनाच्या परवानगीविना गावातील मंडईत तमाशा आणि लावणीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर लावणी सादर करणाऱ्या मुलीवर पैशाची उधळणही करण्यात आली. यातून सार्वजनिक कार्यक्रमात असभ्य वर्तन आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून रचला कट, निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे,” जरांगे पाटलांचं भुजबळांना आवाहन
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया