नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी धुराळा उडवून दिला आहे. राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा होत आहेत. यातच एका पोस्टरमध्ये जनतेला ४५० रूपयात सिलेंडर देण्याचा वादा भाजपने केला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार गेम चेंजर, निकालानंतर मुंबईत, दिल्लीत बैठकांचा सत्र
भाजपा गाजर देणाऱ्यांचा पक्ष आहे. जिथे निवडणुका तिथे खैरात वाटायची जिथे निवडणुका नाही तिथे लुटमार करायची, हा धंदाच भाजपने सुरू केलं आहे. राजस्थान निवडणुकीत ४५० रूपयात सिलेंडर देण्याचे गाजर भाजपने मतदारांना दाखवले आहे. पण त्याच सिलेंडरकरीता महाराष्ट्रातील जनतेकडून भाजप १००० रूपये मोजून घेत असल्याचा टोला लगावला आहे.
हेही वाचा…“भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात इतिहासात पहिलाच वापर “, शरद पवार गटाने एकनाथ शिंदेंना डिवचलं
राजस्थानमध्ये सत्ता पाहिजे म्हणून खटाटोप सुरू आहे, मग महाराष्ट्रात महायुती सरकार कसली वाट बघत आहे ? खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामळेच प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांना जनतेचे टोमणे प्रसाद म्हणून मुकाटपणे खावे लागतात. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
“भाजपा”
गाजर देणाऱ्यांचा पक्ष…जिथे निवडणुका तिथे खैरात वाटायची
जिथे निवडणुका नाही तिथे लुटमार करायची …हा धंदाच भाजपने सुरू केलंय.राजस्थान निवडणुकीत ४५० रुपयात सिलेंडर देण्याचे गाजर भाजपने मतदारांना दाखवले आहे.पण त्याच सिलेंडरकरीता महाराष्ट्रातील जनतेकडून भाजप १००० रुपये… pic.twitter.com/QpZ36rpiQd
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी जायकवाडीतून पाणी न सोडण्याचा निर्णय,” अशोक चव्हाणांनी केली मोठी मागणी
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली
हेही वाचा…राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर, मोदींची जादू संपली की काय?
हेही वाचा…‘’पिक्चर अभी बाकी है’’ म्हणत संजय राऊतांनी मकाऊतला ‘तो’ व्हिडीओ दाखवला!
हेही वाचा…चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला आयोगाची आरोपीवर कारवाई करण्याची मागणी