नांदेड : नाशिक नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. मराठवाडा पाणीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थिगिती नाकारली असून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखला तरी अद्याप जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही. त्यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात इतिहासात पहिलाच वापर “, शरद पवार गटाने एकनाथ शिंदेंना डिवचलं
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे, पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी एक पत्र ट्विट करत असं म्हटलं आहे की, सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला मा. सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी आग्रही मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे.
हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे, पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या…— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली
हेही वाचा…राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर, मोदींची जादू संपली की काय?
हेही वाचा…‘’पिक्चर अभी बाकी है’’ म्हणत संजय राऊतांनी मकाऊतला ‘तो’ व्हिडीओ दाखवला!
हेही वाचा…चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला आयोगाची आरोपीवर कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार गेम चेंजर, निकालानंतर मुंबईत, दिल्लीत बैठकांचा सत्र