बुलढाणा : अकोल्याची घटना ताजी असताना जिल्ह्याताली तरवाडी गाव बोरखेडी पोलिस स्टेशन नांदुरा तालुक्यात एका १७ वर्षाच्या तरूणाने चॉकलेटचे आमिष दाखवून क्रुरपणे अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने चिमुकीच्या डोक्यात वीट मारून तिला जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…सकाळी अपात्र खासदारांच्या यादीतून नाव वगळलं, दुपारी अजित पवारांची भेट, अमोल कोल्हे म्हणाले..,
दोन दिवसापुर्वी अकोल्यात गावगुडांने तरूणीला सिगारेटचे चटके देत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात मागील ८ दिवसात ३ घटना घडल्याने सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावरून आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात राज्य सरकारने या सर्व प्रकाराला गांभीर्याने घेऊन शक्ती कायदा विधेयक मंजुर केल्याशिवाय पर्याय नाही, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
हेही वाचा…२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?
दरम्यान, बुलढाण्यातील घटना अत्यंत अमानवी, निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. बुलढाणा पोलिस अधिक्षकांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून पुढील वैद्यकीय उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझ्या आयोगाच्या सदस्या तसेच आमदार अमोल मिटकीर रूग्णालयात उपस्थितीत आहे. याचा पाठपुराव करीत आहे. असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय.
आदरणीय ताई,बुलडाणा व अकोला जिल्ह्यात मागील ८ दिवसात ३ घटना अशाच घडल्या. पोलीस प्रशासन ढिम्म आहे. येणाऱ्या अधिवेशनात राज्य सरकारने या सर्व प्रकाराला गांभीर्याने घेऊन “शक्ती कायदा विधेयक” मंजुर केल्याशिवाय या घटनेला आळा बसणार नाही.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks https://t.co/41UuYkMnnc
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार गेम चेंजर, निकालानंतर मुंबईत, दिल्लीत बैठकांचा सत्र
हेही वाचा…“भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात इतिहासात पहिलाच वापर “, शरद पवार गटाने एकनाथ शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र