मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात आहे. या निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुती तसेच महाविकास आघाडींच्या बैठका पार पडणार असून पुढची रणनिती ठरवली जाणार आहे.
हेही वाचा…२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?
देशातील राजस्थान, मिझोरम, तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. या निकालानंतर महायुतीची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी तसेच इंडियाचीही बैठक मुंबईत होणार असून या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…शिरूरचं राजकारण तापलं..! आढळराव पाटील अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनंतर अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला विशेष महत्व आले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षण विषय, उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री आणि महामंडळ वाटप बाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…“भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं”,जरांगे पाटलांनी भुजबळांना पुन्हा डिवचलं
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी देखील मुंबईत बैठक पार पडणार आहे. यातच या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा केल्याची शक्यता आहे. यातच पाच राज्यांच्या निवडणुकीत काॅंग्रेसला चांगलं यश मिळालं तर राज्यात काॅंग्रेस पक्ष सर्वात जास्त जागांवर आपला दावा सांगणार असल्याची माहिती समोर आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात इतिहासात पहिलाच वापर “, शरद पवार गटाने एकनाथ शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र
हेही वाचा…सकाळी अपात्र खासदारांच्या यादीतून नाव वगळलं, दुपारी अजित पवारांची भेट, अमोल कोल्हे म्हणाले..,