नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष फुटीनंतर प्रथमच शिंदे गटाने माजी मंत्री राजेंद्र गुढा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदू ह्यदय स्रमाट असा उल्लेख करण्यात आल्याने ठाकरे गटाने शिंदेंवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
गद्दार गटाला प्रचारासाठी बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागत आहे. राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर केला म्हणजे मोदींची जादू संपली की काय? राजस्थानमध्ये नक्कीच भाजपचा पराभव होईल. असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र
दरम्यान, पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार! असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…‘’पिक्चर अभी बाकी है’’ म्हणत संजय राऊतांनी मकाऊतला ‘तो’ व्हिडीओ दाखवला!
हेही वाचा…चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला आयोगाची आरोपीवर कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार गेम चेंजर, निकालानंतर मुंबईत, दिल्लीत बैठकांचा सत्र
हेही वाचा…“भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात इतिहासात पहिलाच वापर “, शरद पवार गटाने एकनाथ शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….