नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष फुटीनंतर प्रथमच शिंदे गटाने माजी मंत्री राजेंद्र गुढा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदूह्यदयस्रमाट असा उल्लेख करण्यात आल्याने ठाकरे गटाने शिंदेंवर जोरदार टिका केली आहे. यावर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
हेही वाचा…‘’पिक्चर अभी बाकी है’’ म्हणत संजय राऊतांनी मकाऊतला ‘तो’ व्हिडीओ दाखवला!
संजय राऊत यांनी शिंदे यांची शिवसेनेची चिंता करू नये. पक्षाचं नाव आणि चिन्ह आणि हिंदुत्वाच्या बाळासाहेब यांचे विचार एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. तुमचं अस्तित्व संपलं आहे, यांची काळजी घ्या. एकनाथ शिंदे यांनी हिंदू ह्यदयसम्राट लावलं नाही त्यांच्या तिकडच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. त्यांच्या मनात बाळासाहेबच हिंदुह्रदयसम्राट आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
हेही वाचा…चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला आयोगाची आरोपीवर कारवाई करण्याची मागणी
मुख्यमंत्री कधीही स्वत: ला तसे समजत नाही. या देशात आणि राज्यात फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुह्यदयसम्राट म्हटलं जाते. मुख्यमंत्री आम्हाला कधीही सांगत नाही, माझं नाव हे लावा आणि ते लावा. आम्हाला खात्री आहे ते कधी करणार नाही. राजस्थानमध्ये जे लिहिलं गेलं त्याची आम्हाला कल्पना नाही आहे. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रतोद भरतशेट गोगावले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार गेम चेंजर, निकालानंतर मुंबईत, दिल्लीत बैठकांचा सत्र
गद्दार गटाला प्रचारासाठी बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागत आहे. राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर केला म्हणजे मोदींची जादू संपली की काय? राजस्थानमध्ये नक्कीच भाजपचा पराभव होईल. असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार! असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला.
पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा?
जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे!
त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल!जनता दूधखुळी नाहीये,
सगळ्याचा हिशोब होणार! pic.twitter.com/nBJrne46Lb— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते”
हेही वाचा…“खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप”
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी जायकवाडीतून पाणी न सोडण्याचा निर्णय,” अशोक चव्हाणांनी केली मोठी मागणी
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली
हेही वाचा…राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर, मोदींची जादू संपली की काय?