मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादीनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू असतानाच आता संसदेतील खासदारांचं निलंबण करण्याची मागणी दोन्ही गटाच्या वतीने करण्यात आली आहे. यातच अजित पवार गटाने श्रीनिवास पाटलांना यांच्याविरोधात देखील निलंबणाची कारवाई करण्याचं पत्र लिहिलं असून त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर जोरदार टिका केली. तसेच सुळेंनी अजित पवारांवरही निशाणा साधला. त्यावरून आता अजित पवार गटाकडून सुळेंना प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा
राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं? असा सवाल निवडणुक आयोगात करण्यात आला. त्यावरून दादांनी काय नाय केलं ? असं म्हणत अजित दादांचा अपमान करणारी घटना आज निवडणुक आयोगात घडली. हे पण एकण्याची वेळ येईल, याचा विश्वासच बसत नाही. राजकीय विरोधक म्हणून तुम्ही टिका करू शकता पण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासाठी दादांनी काहीच नाही केलं हा आरोप खपवून घेणार नाही. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी केला.
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया
सगळ्या महाराष्ट्रानं दादांना डोळ्यानं पाहिलं आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत पक्षासाठी निस्वार्थपणे काम करणारे दादा, कार्यकर्त्यांच्या मदतीला सदैव धावणारे दादा, साहेब केंद्रात असताना एकहाती राज्य सांभाळणारे दादा, आजारी असतानाही गावं न गाव पायाला भिंगरी लावून फिरणारे दादा, लोकांच्या अडचणी जाणून घेण्यास जनता दरबार घेणारे दादा, शेतक-यांच्या बांधावर जाणारे दादा, असंही सुरज चव्हाण यांनी म्हटले.
दादांनी काय नाय केलं…?
अजित दादांचा अपमान करणारी घटना आज निवडणूक आयोगात घडलीय… हे पण ऐकण्याची वेळ येईल याचा विश्वासच बसत नाही.
राजकीय विरोधक म्हणून तुम्ही टिका करू शकता पण राष्ट्रवादी कांग्रेस पक्षासाठी दादांनी काहीच नाही केलं हा आरोप खपवून घेणार नाही…
विरोधी वकील…— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) November 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मग भाजपचे सरकार महाराष्ट्रात ४५० रूपयांना सिलिंडर का देत नाही?” पटोलेंचा भाजपला सवाल
हेही वाचा…कार्यक्रमात तरुणीवर पैसे उधळणे अजित पवार गटाच्या सभापतीला भोवलं, सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून रचला कट, निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे,” जरांगे पाटलांचं भुजबळांना आवाहन
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका