जालना : अंतरवाली सराटीत पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणात ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये. ऋषिकेश बेदरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून काडतुसे आणि पिस्तूल जप्त केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. दगडफेकीत अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले होते. दबावाला बळी न पडता पोलिस कारवाई करीत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा
अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेक आणि सोलापूर धुळे महामार्गावर झालेल्या जाळपोळीच्या घटनावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून अबंड पोलिसांनी ऋषिकेश बेदरे याला पोलिसांनी अटक केली आहे. काल सांयकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून आज सकाळी ११ वाजता अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. यातच आता त्यांना जामीन मिळणार की पोलिस कोठडी देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीत पोलिस आणि गावकरी अंत्यत जखमी झाले होते. याप्रकरणाचा मास्टर माईंट नेमका कोण? असा प्रश्न निर्माण करत आरोपीला शोधून कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे जिवंत काडतुसे आणि पिस्तूल सापडल्याने हा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं?” निवडणुक आयोगात सवाल, अजित पवार गटाने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
हेही वाचा…कार्यक्रमात तरुणीवर पैसे उधळणे अजित पवार गटाच्या सभापतीला भोवलं, सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून रचला कट, निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे,” जरांगे पाटलांचं भुजबळांना आवाहन
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका