पुणे : जालन्यातील अंबड येथे झालेल्या सभेनंतर आता मंत्री छगन भुजबळांची हिंगोलीत उद्या रविवारी सभा होत आहे. या सभेसाठी राज्यातील ओबीसींचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता राज्यात एकीकडे मनोज जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भुजबळांच्या सभा होतांना दिसत आहेत. यातच आता छगन भुजबळ यांचं २८ नोव्हेंबरला रॅली काढून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
हेही वाचा…“२०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही,” सुळेंच्या टिकेला अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या सभा महाराष्ट्रात होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी छगन भुजबळ प्रयत्न करतांना दिसत आहेत. यातच छगन भुजबळ यांची इंदापूर येथे जाहीर सभा होणार असून पुरंदर तालुक्यातील सासवड जेजूरीमध्ये रॅली काढून जंगी स्वागत पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.
हेही वाचा…प्रवीण दरेकरांची ‘राज्य सरकार समन्वयक’ म्हणून निवड, ‘मकाऊचा’ उल्लेख करत बावनकुळेंवर रोहित पवारांची टिका
२८ नोव्हेंबर रोजी पुणे येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमास छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. पुरंदर ओबीसी बचाव समितीच्या वतीने सभा घेण्याची देखील मागणी यावेळी करण्यात येणार आहे. ओबीसी व मराठा समाज प्रत्येक गावात एकत्रित गुण्या गोविंदाने नांदत असताना मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी देखील मागणी पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई”, सुळेंवर टिका अन् रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…राजस्थानच्या १९९ विधानसभा जागांसाठी मतदान सुरू, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कार
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करणारा मुख्य आरोपी अटकेत, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“..तर आगामी निवडणूकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन”, कोणी फोडली डरकाळी ?
हेही वाचा…“दादासमोर नाक उचलून ,धाकुटी विचारे, तू कुठं काय केलंस?”, रूपाली चाकरणकरांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं