मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू असतानाच आता संसदेतील खासदारांचं निलंबण करण्याची मागणी दोन्ही गटाच्या वतीने करण्यात आली आहे. यातच अजित पवार गटाने श्रीनिवास पाटलांना यांच्याविरोधात देखील निलंबणाची कारवाई करण्याचं पत्र लिहिलं असून त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर जोरदार टिका केली. तसेच सुळेंनी अजित पवारांवरही निशाणा साधला. त्यावरून आता अजित पवार गटातील महिल्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुळेंना प्रत्युत्तर देत कविता पोस्ट केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी कविता पोस्ट करत प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…प्रवीण दरेकरांची ‘राज्य सरकार समन्वयक’ म्हणून निवड, ‘मकाऊचा’ उल्लेख करत बावनकुळेंवर रोहित पवारांची टिका
रूपाली चाकणकर यांनी सुळेंवर टिका करतांना पोस्ट केलेली पोस्ट
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?
चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?
तो झिजला,
पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?
पाया भरला,
विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?
नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?
घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?
*- प.पा.*
रोहिणी खडसे यांनी पोस्ट केलेली कविता
वाचूनी हसावे की करावी निंदा, कळावे न काही,
एवढं मात्र नक्की, पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई…
सेवेच्या गंधापुढे काय कौतुक चंदनाचं?
आमचा पाठीराखा योध्दा खंबीर, बळ आहे लढण्याचं…
तो झिजला नाही , झिजणारा आहे सह्याद्री ,
तुमची नाही मजल इतकी, कृतज्ञतेच्या संस्काराखाली तुम्ही मात्र दरिद्री…
दिल्लीच्या तख्तापुढे ईमान तुमचा विकला गेला,
सत्तेच्या मोहापायी बाप मात्र पोरका झाला…
घराच्या वास्यावर टपून बसलाय गाव सारा,
आयोग पडलाय वा-यावर केवळ सत्तेचाच झालाय पसारा….
दामापायी पायघड्या घालणारी, नव्हे आमची वृत्ती,
सुनावणीत दिसू लागलीये हार, म्हणूनच तुमच्या ठायी पराभवाची भीती…
कुणाच्या जीवावर नाही, स्वतःच्या हिंमतीवर भिडण्याचं बळ आहे,
मनगटाभोवती आमच्या हक्काच्या वेळेचं वळ आहे…
असो ज्याचे त्याचे कर्म ज्याची त्याची निष्ठा,
सहन होईना आता धुरकट जळणं,
म्हणूनच वेगळ्या चुलीकडून व्यक्त होतायेत हालअपेष्टा…
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं? असा सवाल निवडणुक आयोगात करण्यात आला. त्यावरून दादांनी काय नाय केलं ? असं म्हणत अजित दादांचा अपमान करणारी घटना आज निवडणुक आयोगात घडली. हे पण एकण्याची वेळ येईल, याचा विश्वासच बसत नाही. राजकीय विरोधक म्हणून तुम्ही टिका करू शकता पण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासाठी दादांनी काहीच नाही केलं हा आरोप खपवून घेणार नाही. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी केला.
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?पाया भरला,…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 25, 2023
वाचूनी हसावे की करावी निंदा,कळावे न काही,
एवढं मात्र नक्की, पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई…सेवेच्या गंधापुढे काय कौतुक चंदनाचं?
आमचा पाठीराखा योध्दा खंबीर, बळ आहे लढण्याचं…तो झिजला नाही , झिजणारा आहे सह्याद्री ,
तुमची नाही मजल इतकी,
कृतज्ञतेच्या संस्काराखाली तुम्ही मात्र…— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राजस्थानच्या १९९ विधानसभा जागांसाठी मतदान सुरू, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कार
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करणारा मुख्य आरोपी अटकेत, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“..तर आगामी निवडणूकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन”, कोणी फोडली डरकाळी ?
हेही वाचा…“दादासमोर नाक उचलून ,धाकुटी विचारे, तू कुठं काय केलंस?”, रूपाली चाकरणकरांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
“२०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही,” सुळेंच्या टिकेला अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..