मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू असतानाच आता संसदेतील खासदारांचं निलंबण करण्याची मागणी दोन्ही गटाच्या वतीने करण्यात आली आहे. यातच अजित पवार गटाने श्रीनिवास पाटलांना यांच्याविरोधात देखील निलंबणाची कारवाई करण्याचं पत्र लिहिलं असून त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर जोरदार टिका केली. तसेच सुळेंनी अजित पवारांवरही निशाणा साधला. त्यावरून आता अजित पवार गटातील महिल्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुळेंना प्रत्युत्तर देत कविता पोस्ट केली आहे.
हेही वाचा…कार्यक्रमात तरुणीवर पैसे उधळणे अजित पवार गटाच्या सभापतीला भोवलं, सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
रूपाली चाकणकर यांनी सुळेंवर टिका करतांना पोस्ट केलेली पोस्ट
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?
चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?
तो झिजला,
पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?
पाया भरला,
विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?
नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?
घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?
*- प.पा.*
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं? असा सवाल निवडणुक आयोगात करण्यात आला. त्यावरून दादांनी काय नाय केलं ? असं म्हणत अजित दादांचा अपमान करणारी घटना आज निवडणुक आयोगात घडली. हे पण एकण्याची वेळ येईल, याचा विश्वासच बसत नाही. राजकीय विरोधक म्हणून तुम्ही टिका करू शकता पण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासाठी दादांनी काहीच नाही केलं हा आरोप खपवून घेणार नाही. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी केला.
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?पाया भरला,…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 25, 2023
READ ALSO :
“२०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही,” सुळेंच्या टिकेला अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..
हेही वाचा…प्रवीण दरेकरांची ‘राज्य सरकार समन्वयक’ म्हणून निवड, ‘मकाऊचा’ उल्लेख करत बावनकुळेंवर रोहित पवारांची टिका
हेही वाचा…ठाण्यात भाजपला मोठा धक्का, ‘या’ माजी महिला शहर अध्यक्षा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
हेही वाचा…अंतरवाली सराटीत दगडफेकी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पोलिसांनी केली तिघांना अटक
हेही वाचा…“राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं?” निवडणुक आयोगात सवाल, अजित पवार गटाने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर