मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यानंतर राष्ट्रवादी दोन्ही गटातील खासदारांना निलंबणाची कारवाई करण्यात यावी, असं पत्र देण्यात आले. त्यावरून यातच अजित पवार गटाकडून श्रीनिवास पाटील यांचं नाव यादीत टाकलं. परंतु शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं. यावरून शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कोणतंही पाऊस उचलणार नाही. अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. यावरून शरद पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…शिंदेंचा गड ठाकरेंकडून उद्धवस्त, २५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश
एकीकडे साहेबांना दैवत म्हणायचे आणि दुसरीकडे, त्यांना घरातून बाहेर काढायचे कट रचायचे. त्यांनी आपला पक्ष आणि निशाणी देशभर पसरविली आहे. साहेबांनी पक्षाला आणि पक्ष चिन्हाला देशभर अधिष्ठान दिले आहे. त्यांनी जन्म दिलेला पक्ष आणि त्यांनी निर्माण केलेली निशाणी ताब्यात घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न तुम्ही करीत आहात आणि त्यांना दैवत्व बहाल करत आहात. साहेब हे पुरोगामी विचारांचे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जीवाचे रान करणारे माणूस आहेत. कृपया, त्यांना दैवत्व बहाल करू नका. निदान आमच्यासाठी ते हदय असलेले माणूस आहेत. असं आव्हाडांनी म्हटलंय.
हेही वाचा…ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला, भुजबळांची होणार ‘या’ ठिकाणी जंगी सभा, रॅलीचंही आयोजन
दरम्यान, सुनील तटकरे साहेब तुम्ही काल पुन्हा शरद पवारांना दैवत म्हणालात. ज्या दैवताला तुम्ही त्यांच्या घरातून बाहेर हुसकावण्याचं काम करताय. त्यांना दैवत म्हणून त्यांचा अपमान का करताय? मुॅंह में राम और पेट में नथुराम, अशी तुमची अवस्था आहे. शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे, मग ते तुमचे दैवत कसले ? असा सवाल आव्हाडांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कार्यकर्त्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
हेही वाचा…भाजपचे खासदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जुंपली, पाणी प्रश्नावरून भाजपचा खासदार खासदारकीचा राजीनामा देणार ?
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक, कार्यकर्ते आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…पंकजा मुंडेंवर खरंच अन्याय झाला आहे का ? शिंदे गटाच्या दाव्यानंतर भाजपकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…“मुस्लिम महिलांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केलं, त्यामुळे २०२४ ला मोदीच येणार”