पुणे : राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे. यातच आज ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी थेट शासकीय विश्रामगृहात जाऊन धमकी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा बघायला मिळला. पोलिसांनी सावधगिरी करून हा मोठा प्रसंग टाळला.
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कार्यकर्त्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात छगन भुजबळांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते भुजबळांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी भुजबळांच्या गाडीजवळ येऊन त्यांना आव्हान दिलंय. जाधवांनी भुजबळांच्या गाडीजवळच त्यांची गाडी लावत दोन्ही गाड्यांमधी अंतर दाखवलं. त्यानंतर आमच्या आंदोलनाला नख लावण्याचे काम करू नका. वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…भाजपचे खासदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जुंपली, पाणी प्रश्नावरून भाजपचा खासदार खासदारकीचा राजीनामा देणार ?
या प्रकरणानंतर ओबीसी कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत. यानंतर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसरात तणावाचं वातावरण निर्माण केलं. यातच भुजबळांची गाडी फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांचा ओबीसी परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त केला. तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अशी भूमिका देखील भुजबळांच्या समर्थकांनी घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हातपाय तोडण्याची भाषा, ओबीसी विरूद्ध मराठा संघर्ष पेटतोय, बच्चू कडूंनी दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणावरून विविध समाजातील संघर्ष टाळायचा असेल तर..,” विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला ? शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप, राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
हेही वाचा…अबब… तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड! मोशी येथील देशी गोवंश व अश्व प्रदर्शनाला तुफान गर्दी
हेही वाचा…दैवत म्हणून शरद पवार यांचा अपमान का करताय? जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना सुनावलं