बीड : राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. कपीलधार येथे धर्मसभेसाठी आले असता दिपक केसरकर यांना शिक्षक भरतीवरून काही तरूणांनी घेराव घातला. यावेळी शिक्षक भरतीवरून प्रश्न विचारताच केसरकर संतापले अन् तुमची माहिती घेऊन तुम्हाला अपात्र करू, अशी थेट धमकीच त्यांनी तरूणांना दिला. यावरून आता दिपक केसरकर यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे.
हेही वाचा…दैवत म्हणून शरद पवार यांचा अपमान का करताय? जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना सुनावलं
राज्यात मागील काही वर्षापासून अनेक विभागातील भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यावरून बीड येथील कार्यक्रमाच्या वेळी दिपक केसरकर आले असता त्यांना काही तरूणांनी घेराव घातला. यावेळी भरती प्रक्रियेतून बाद करण्याचा नवीन कायदा केला आहे का ? असा सवाल केल्यानंतर दिपक केसरकर यांनी तरूणांवर संताप व्यक्त केला आहे. यावरून तुमची माहिती घेऊन तुम्हाला अपात्र करू, असा थेट इशाराच दिपक केसरकर यांनी भावी शिक्षिकेला दिला. त्यावरून आता राज्यातील वर्तुळातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कार्यकर्त्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
ही सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा? असा संतापजनक सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिपक केसरकर यांना केला आहे. शिक्षक भरतीसंदर्भात युवकांचा कोणी वाली नाही. त्यातील गैरप्रकारांची, विलंबणाची कारणे मंत्री म्हणून तुम्हाला विचारले तर युवकांनी गुन्हा केला का ? तुम्ही लोकसेवक म्हणून तिथे बसले आहात, लोक प्रश्न विचारतीलच. मात्र, प्रश्नकर्त्यांना तुमची माहिती घेऊन अपात्र करण्याच्या धमकीची भाषा कशासाठी ? असा सवाल देखील रोहिणी खडसे यांनी केला आहे.
हेही वाचा…भाजपचे खासदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जुंपली, पाणी प्रश्नावरून भाजपचा खासदार खासदारकीचा राजीनामा देणार ?
दरम्यान, तुम्ही किती कडक आहात ते दिसतय शिक्षणमंत्री महोदय. तुमची भाषा पण महाराष्ट्र ऐकतोय. तुमचं वर्तन ही महाराष्ट्र बघत आहे. शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
तुम्ही किती कडक आहात ते दिसतय शिक्षणमंत्री महोदय…. तुमची भाषा पण महाराष्ट्र ऐकतोय… तुमचं वर्तन ही महाराष्ट्र बघत आहे.
शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का ? pic.twitter.com/ZFkdeYllii
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 27, 2023
ही सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?? आदरणीय मंत्रीमहोदय @dvkesarkar केसरकर साहेब, शिक्षक भरतीसंदर्भात युवकांचा कोणी वाली नाही. त्यातील गैरप्रकारांची, विलंबाची कारणे मंत्री म्हणून तुम्हाला विचारले तर युवकांनी गुन्हा केलाय का? तुम्ही लोकसेवक म्हणून तिथे बसले आहात,… pic.twitter.com/Yggo1CDP0R
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते,” थेट भुजबळांच्या गाडीजवळ गाडी लावत दिला इशारा, वातावरण चिघळलं
हेही वाचा…हातपाय तोडण्याची भाषा, ओबीसी विरूद्ध मराठा संघर्ष पेटतोय, बच्चू कडूंनी दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणावरून विविध समाजातील संघर्ष टाळायचा असेल तर..,” विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला ? शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप, राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
हेही वाचा…अबब… तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड! मोशी येथील देशी गोवंश व अश्व प्रदर्शनाला तुफान गर्दी