मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने कार्यकर्ता व महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र सभेच्या ठिकाणी शरद पवार येताच मुसळधार आला. तर निराशेवर मात करून संघर्ष करून धैर्याने पुढे जाऊ असं म्हणत शरद पवारांनी भर पावसात आपलं भाषण सुरू ठेवलं. यानंतर शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची सर्वांना आठवण झाली.
हेही वाचा…हातपाय तोडण्याची भाषा, ओबीसी विरूद्ध मराठा संघर्ष पेटतोय, बच्चू दिला इशारा
यातच शरद पवारांचा पावसातला फोटो ट्विट करत रोहित पवारांनी साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक आहोत. असं म्हटलं. तसे विचारांच्या लढाईसाठी वय महत्वाचं नसतं. महत्वाची असते ती म्हणजे जिद्द आणि माणसाचा लढाऊबाणा. याच जिद्दीवर पवार साहेबांनी अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते घडवले आणि सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभूतपुर्व निर्णय घेत बदल घडवले. आधुनिक महाराष्ट्र घडवला. असंही रोहित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…“आरक्षणावरून विविध समाजातील संघर्ष टाळायचा असेल तर..,” विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, पाऊस येताच कार्यकर्त्यांची थोडी धावपळ झाली. त्यानंतरही शरद पवारांनी आपलं भाषण सुरू ठेवलं. यावेळी ते म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. याच दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या संविधानाता सन्मान केला जातो. परिस्थितीवर मात करून व निसर्गाची साथ असो नसो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी देशाच्या ऐक्यासाठी काम केले.
विचारांच्या लढाईसाठी वय महत्वाचं नसतं, महत्त्वाची असते ती म्हणजे जिद्द आणि माणसाचा लढाऊ बाणा.
याच जिद्दिवर @PawarSpeaks साहेबांनी अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते घडवले आणि सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभूतपूर्व निर्णय घेत बदल घडवले. आधुनिक महाराष्ट्र घडवला.
साहेब तुमच्या… pic.twitter.com/Msi16I4BQK
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं..,” शिक्षणमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळेंची टिका
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा
हेही वाचा…“शिंदे समितीचं कामं संपलंय, आता शिंदे समिती बरखास्त करा,” छगन भुजबळांची मोठी मागणी
हेही वाचा…“सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?” शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते,” थेट भुजबळांच्या गाडीजवळ गाडी लावत दिला इशारा, वातावरण चिघळलं