मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आता जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिले जात असून आता उद्धव ठाकरे यांनी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यानुसार आता ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबीर घेतले जाणार आहे.
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला ? शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप, राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांनी यादी जाहिर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर याची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची तोफ धडकणार आहे.
हेही वाचा…अबब… तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड! मोशी येथील देशी गोवंश व अश्व प्रदर्शनाला तुफान गर्दी
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर अनंत गिते यांच्याकडे रायगड, मावळ, चंद्रकांत खैरे यांच्याकडे संभाजीनगर, जालना, खासदार अरविंद सावंताकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम वर्धा, अनिल देसाई यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, सातार, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, भास्कर जाधव यांच्याकडे नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.
हेही वाचा…दैवत म्हणून शरद पवार यांचा अपमान का करताय? जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना सुनावलं
तर खासदार विनायक राऊत यांच्याकडे रत्नागिरी, सिंधुदूर्ग, खासदार राजन विचारे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, आमदार रविंद्र वायकर यांच्याकडे नांदेड, हिंगोली, परभणी, आमदार सुनील प्रभू यांच्याकडे सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे समितीचं कामं संपलंय, आता शिंदे समिती बरखास्त करा,” छगन भुजबळांची मोठी मागणी
हेही वाचा…“सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?” शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते,” थेट भुजबळांच्या गाडीजवळ गाडी लावत दिला इशारा, वातावरण चिघळलं
हेही वाचा…हातपाय तोडण्याची भाषा, ओबीसी विरूद्ध मराठा संघर्ष पेटतोय, बच्चू कडूंनी दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणावरून विविध समाजातील संघर्ष टाळायचा असेल तर..,” विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल