पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुणे पोलिस ललित पाटील प्रकरणाबाबत कारवाई करत नसल्यामुळे बुधवारपासून पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रविंद्र धंगेकर यांनी दिला आहे. ललित पाटील हा गुन्हेशाखेतील एका अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. त्या अधिकाऱ्यासोबत व्हिडीओ कॉल करून बोलायचा असाही आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
हेही वाचा…“शिंदे समितीचं कामं संपलंय, आता शिंदे समिती बरखास्त करा,” छगन भुजबळांची मोठी मागणी
ललित पाटील ड्रग्जप्रकरणात डॉ. संजीव ठाकूर आणि त्यांच्यासह डॉक्टर्स, पोलीस, तुरूंग अधिकारी यांच्या सर्वांच्या चौकशा गतीने होत नाहीत. या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात यावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु देवेंद्र फडणवीस यांचं गृहखातं लक्ष देत नाहीत. सरकारच्या लोकांचा यांच्यावर दबाव आहे. पोलिसांवर दबाव आहे. त्यामुळे पोलिसांनी हा दबाव बाजूला ठेवावा. त्याची चौकशी व्हावी, यासाठी बुधवार पासून आंदोलनाला बसणार असल्याचं रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?” शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर यात राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप मागील काही दिवसापासून केला जात आहे. यातच ससून रूग्णालयाचे डॉक्टर, डीन यांची देखील चौकशी करण्यात यावी, पोलिसांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या थरारक प्रवासाची कहाणी, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांनी आदिवासींची संघर्ष यात्रा रोखली, त्यानंतर ठाण्यातच दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…“साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक”, शरद पवारांची पावसातली सभा पुन्हा चर्चेत
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं..,” शिक्षणमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळेंची टिका
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा