मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मावीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट मागच्या वर्षी चांगलाच गाजला. या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील पटकावले. यातच आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रक्षेकांच्या भेटीला येणार असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका देखील असणार आहे. यातच सुरत, गुवाहाटी, ते मंत्रालय असा एकनाथ शिंदे यांच्या संघर्षाची थरारक कहाणी यातून उलगडणार आहे. या चित्रपटसाठी आजपासून शुटिंग सुरू झाली असून मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून हजेरी लावलीय.
हेही वाचा…“सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?” शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्मवारी स्व. आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या टीमचे अभिनंदन करतो. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्व. आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वत: चे आयुष्य झोकून दिले. सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेऊन समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच दिघे साहेबांची कार्यपद्धती होती. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते,” थेट भुजबळांच्या गाडीजवळ गाडी लावत दिला इशारा, वातावरण चिघळलं
दरम्यान, धर्मवीर २ चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे तर अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार आहेत. यात उद्धव ठाकरे यांचं पात्र असणार की नाही, त्यावर असून चर्चा झाली नाही. तसेच अन्य कलाकरांची नावे गुलदत्यात ठेवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांनी आदिवासींची संघर्ष यात्रा रोखली, त्यानंतर ठाण्यातच दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…“साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक”, शरद पवारांची पावसातली सभा पुन्हा चर्चेत
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं..,” शिक्षणमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळेंची टिका
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा
हेही वाचा…“शिंदे समितीचं कामं संपलंय, आता शिंदे समिती बरखास्त करा,” छगन भुजबळांची मोठी मागणी