नवी दिल्ली : देशाचे उपराष्टपती जगदीप धनगड यांनी महात्मा गांधी यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने त्यांच्यावर आता टिका केली जात आहे. महात्मा गांधी हे महापुरूष तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरूष असल्याचं विधान जगदीप धनगड यांनी केलं आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर टिका केलीय.
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला
गेल्या शतकातील महापुरूष महात्मा गांधी होते तर या शतकातील युगपुरूष हे नरेंद्र मोदी आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं काम केलं आहे. असंही जगदीप धनगड यांनी म्हटलं आहे. त्यावर कोण पुरूष, कोण युगपुरूष ते २०२४ साली कळेलच. युगपुरूष हे जनता ठरवते, असा टोला संजय राऊतांनी उपराष्ट्रपतींना लगावला आहे.
हेही वाचा…पक्षाच्या एकनिष्ठ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांनी जाहीर केलं नाव
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रचार प्रसार केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा नरेंद्र मोदीच राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपकडून तसा प्रचार केला जात असल्याचं काही महिन्यापासून दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून सुपारी देऊन पाठवलं होतं, मग..,”सत्तेतून का बाहेर पडलो? तटकरेंनी दिलं उत्तर
हेही वाचा…“ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?” राऊतांनी नार्वेकरांना डिवचलं
हेही वाचा…रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली, मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयावर कब्जा करणार ?
हेही वाचा…तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा, ‘हा’ माजी मंत्री मुख्य आरोपी, आज निकाल लागणार
हेही वाचा…“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर