मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तेलंगणा दौऱ्यावर असून ते भाजपच्या तर्फे प्रचार करणार आहेत. या दौऱ्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच टोला लगावला आहे. तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ? असा खोचक टोला ठाकरेंनी हाणला आहे. तसेच राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अन् मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात प्रचाराला गेल्याची टिकाही त्यांनी केलीय.
हेही वाचा…“ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?” राऊतांनी नार्वेकरांना डिवचलं
राज्य वाऱ्यावर पडलं असताना एक फुल दोन हाफ, दुसरे दोन हाफ कुठे आहेत, काही कल्पना नाही. असंविधानिक मुख्यमंत्री स्वत: चं घर सोडून दुसऱ्याची घरं धुंडाळतात. स्वत: च घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या पंचतारांकीत शेती माझ्या गरीब शेतकऱ्याला ही मिळो, ही मी ईश्वरचरणी प्राथर्ना करतो. रामलल्लाच्या दर्शनापेक्षा तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार ? असा टोलाही ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
हेही वाचा…रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली, मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयावर कब्जा करणार ?
दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वत:च घरं, स्वत: चं राज्य का नाही सांभाळत ? भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा. आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय, तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धुर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा. मी शिवसैनिकांना आवाहन करतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा. त्यांना दिलासा द्या, असंही ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलंय. ज्यांची कोणावर निष्ठा नाही ते वस्तुनिष्ठ माहिती काय घेणार असा सवाल करत ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
हेही वाचा…“भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा, महाराष्ट्रात आम्ही निवडणुकांची वाट बघतोय,”
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“मोदींशी महात्मा गांधींशी तुलना, राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला”, म्हणाले..
हेही वाचा…“पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून सुपारी देऊन पाठवलं होतं, मग..,”सत्तेतून का बाहेर पडलो? तटकरेंनी दिलं उत्तर