पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यापुढील सर्व निवडणुका महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधीच मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही मावळ जागेवर दावा सांगितल्याने याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे म्हणून खासदार आहेत. २०२४ साठीही मीच याठिकाणी उभा राहणार असं श्रीरंग बारणेंनी सांगून टाकले. त्यानंतर या जागेवर भाजपचे नेते आणि माजी मंत्री बाळा भेडगे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीवर दावा सांगितला. त्यानंतर आता आमच्या पक्षाची ताकद जास्त असल्याने मावळची जागा आम्हाला मिळावी, असं अजित पवार गटाचे नेते आणि आमदार सुनील शेळके यांनी सांगिल्याने एक जागा अन् उमेदवार ३ अशी स्थिती आता मावळात तयार झाली आहे.
हेही वाचा…“भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा, महाराष्ट्रात आम्ही निवडणुकांची वाट बघतोय,”
दरम्यान, श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनील शेळके भडकले. उमेदवारी मिळाली म्हणजे निवडून आलो असे होत नाही, तसे स्वप्नही त्यांनी पाहू नये. यावेळई पुन्हा लॉटरी लागेल हा संभ्रम काढून टाकावा असा थेट इशाराच आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणेंना दिला. मावळ लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीची पकड मजबूत असून ही जागा पक्षालाच मिळावी असा हट्ट सुनील शेळके यांनी केलाय.
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं
यातच श्रीरंग बारणे यांनी आपल्या ९ वर्षाच्या कामाचा लेखाजेखा द्यावा. मावळ तालुक्यात काय कामे आणली ? कोणत्या मोठ्या योजना आणल्या, किती निधी आणला ? हे जनतेसमोर मांडावे, असं आव्हान सुनील शेळके यांनी दिला आहे. यातच आता महायुतीत ही जागा नेमकी कुणाला मिळणार? याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार पावसात भिजले हा 2024 साठी शुभ शकुन”, महाराष्ट्राचं चित्र पुन्हा बदलणार का ?
हेही वाचा…“आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला देण्यात यावे”, बिचुकलेंची मागणी, कार्यकर्त्यांनी थेट दुग्धाभिषेक घातला
हेही वाचा…“पण तुम्ही डबल इंजिनाची गाडी गाळात घातली”, चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…“विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे”, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप
हेही वाचा…“तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ?” उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला टोला