ठाणे : ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललण्यानंतर दत्ता दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी आज अटक केली आहे. भांडूप पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
हेही वाचा…“आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला देण्यात यावे”, बिचुकलेंची मागणी, कार्यकर्त्यांनी थेट दुग्धाभिषेक घातला
एकनाथ शिंदे यांचा राजस्थानमधील निवडणुक प्रचाराच्या वेळी हिंदुह्यदयसम्राट म्हणून उल्लेख केल्यानंतर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात भादंवि कलम १५३ अ, १५३ ब, १५३ अ १ सी २९४, ५०४, ५०५ १, क अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दत्ता दळवी यांना राहत्या घरातून अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून भांडूप पोलिस स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा…“पण तुम्ही डबल इंजिनाची गाडी गाळात घातली”, चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टिका
दरम्यान, आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार याठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदेंला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ बिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का ? मी स्वत: बघितलेले आहे. परंतु बाळासाहेबांच्या जवळ आला. बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींना जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. गद्दारी केली. पक्षाशी गद्दारी केली. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींना जवळ घेतले आणि त्यांना एवढी मोठी गद्दारी केली. स्वत: गद्दारी केली. पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे. हिंदूह्यदसम्राट वापरत आहेत. अरे xxx च्या तुला हिंदूह्यदय सम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का ? असं दत्ता दळवी यांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना आवाहन, पत्राद्वारे केली ‘ही’ मोठी मागणी
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंनी तेलंगणाच्या लोकांना घातली साद, म्हणाले..,
हेही वाचा…अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडवली दैना, ठाकरे गट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, यादी आली
हेही वाचा…मावळात पेच वाढला, महायुतीच्या तिन्हीही नेत्यांचा जागेवर दावा, ठाकरे फायदा उचलणार ?
हेही वाचा…“शरद पवार पावसात भिजले हा 2024 साठी शुभ शकुन”, महाराष्ट्राचं चित्र पुन्हा बदलणार का ?