बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अग्निवीर योजनेद्वारे मागील वर्षी अनेकांची सैन्यात भरती केली. यातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते यांना लडाखच्या सियाचीन ग्लेशियनमध्ये तैनात असताना वीरमरण आले. अक्षय गवते यांच्या कुटुंबियाला सरकारकडून फक्त दहा लाख रूपयांची मदत जाहीर केल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत हा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशात मांडणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा…अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडवली दैना, ठाकरे गट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, यादी आली
अक्षय गवते हा देशातला पहिला शहीद अग्निवीर असून याआधी पंजाबचा एक अग्नीवीर मृत्यू पावला होता. परंतु त्याने आत्महत्या केली असल्यामुळे त्याला अधिकृत शहीदचा दर्जा मिळाला नाही. असे असताना देखील पंजा सरकारने या अग्निविराच्या कुटुंबीयांना एक कोटी रूपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली. महाराष्ट्र शासन सैनिक शहीद झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रूपये मदत देत असते. असे असताना सरकारने शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना मात्र फक्त दहा लाख रूपयांची मदत जाहीर केली. सैनिक आणि अग्नीविर यांच्यामध्ये करण्यात आलेला हा भेदभाव शहीदांप्रती अनास्था दाखवणारा असून राज्य शासनाने तातडीने त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत दिली पाहिजे. अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…मावळात पेच वाढला, महायुतीच्या तिन्हीही नेत्यांचा जागेवर दावा, ठाकरे फायदा उचलणार ?
दरम्यान, अक्षय गवते हा अग्नीवीर सियाचीन येथे भारतमातेच्या सीमेचे संरक्षण करत असताना शहीद झाला. त्यामुळे मदत देताना सैनिक अग्नीवीर अशा प्रकारे भेदभाव करणे हा अक्षयने देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अपमान आहे. आगामी अधिवेशनामध्ये शहीद अक्षय गवते यांच्या बलिदानाला न्याय देण्यासाठी कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी सरकारकडे करणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
अक्षय गवते हा देशातला पहिला शहीद अग्निविर आहे. त्याआधी पंजाबचा एक अग्नीवीर मृत्यू पावला होता.परंतु त्याने आत्महत्या केली असल्यामुळे त्याला अधिकृत शहीदाचा दर्जा मिळाला नाही. असे असताना देखील पंजाब सरकारने या अग्निविराच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्याबद्दल ‘तो’ शब्द वापरल्याने ठाकरे गटाच्या नेत्याला अटक, शिवसैनिक आक्रमक, राऊतांनी केली जोरदार टिका
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ‘या’ माजी महापौर नेत्याला पोलिसांनी घरातून केली अटक, राजकारण पेटणार
हेही वाचा…शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना आवाहन, पत्राद्वारे केली ‘ही’ मोठी मागणी
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंनी तेलंगणाच्या लोकांना घातली साद, म्हणाले..,