मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आपली भूमिका मांडावी असं महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर आता सरकारमधील कॅबिनेट मंत्रीच भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करू लागल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरून मंत्रिमंडळातच आलेबल नसल्याचं आता दिसून येत आहे.
हेही वाचा…“भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडावी,” कॅबिनेट मंत्र्यांनी भुजबळांना सुनावलं
राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी अशा दोन समाजात वाद सुरू झाला आहे तो निर्थक आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी थोडा संयम बाळगायला हवा. नाही तर मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी आपली भूमिका मांडायला हवी. त्यांच्याबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार केला पाहिजे. असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय.
हेही वाचा…“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?” सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, यावरून काॅंग्रेसच्या ज्येष्ठा महिला नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विश्वासार्हता गमावलेलं हे असंविधानिक सरकार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर जाती जातींमध्ये भांडणे लावणाऱ्या सरकारमध्येच अखेर भांडणे सुरू झाली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मुग गिळून बसणारे मंत्री प्रसारमाध्यमांसमोर आदळआपट करत आहेत. वाह रे मंत्री, वाह रे सरकार, तीन पक्षांचा तमाशा असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी टिका केलीय.
विश्वासार्हता गमावलेलं हे असंविधानिक सरकार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर जाती जातींमध्ये भांडणे लावणाऱ्या सरकारमध्येच अखेर भांडणे सुरू झाली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मुग गिळून बसणारे मंत्री प्रसारमाध्यमांसमोर आदळआपट करत आहेत.. वाह रे मंत्री, वाह रे सरकार…
तीन पक्षांचा तमाशा……— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, जंयत पाटलांनी केली घोषणा
हेही वाचा…कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली, एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“नालायकांनो..! हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे”, ठाकरे अन् शिंदे गटातला वाद पेटला
हेही वाचा…राहुल नार्वेकरांचा मोठा कस लागणार ? सकाळी अधिवेशन तर दुपारी शिवसेना अपात्र याचिकेवर सुनावणी
हेही वाचा…“बीडच्या जाळपोळ घटनामागे राजकीय शक्तीशाली व्यक्तीचा हात”, रोहित पवारांचा आरोप नेमका कुणावर ?