येवला : मराठा आरक्षणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने मंत्री छगन भुजबळांना आपल्याच मतदारसंघात अडचणीचा सामना करावा लागला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान ग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आले असता मराठा समाजाकडून भुजबळांच्या विरोधात गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या.
हेही वाचा…रविकांत तुपकरांसमोर राज्य सरकार झुकलं, ७० ते ८० टक्के मागण्या मान्य, १५ दिवसांची दिली मुदत
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीवरून भुजबळांनी मागील काही दिवसापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. या भूमिकेच्या विरोधात मराठा समाजाकडून भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. येवला दौऱ्यावर येत असताना मराठा समाजाकडून येवल्याच्या सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक एकवटले आहेत. यावेळी भुजबळ गो बॅक अशी जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे.
हेही वाचा…“मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यावाचून आता देशातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही”
दरम्यान, मराठा समाजाच्या विरोधामुळे छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्याचा मार्ग बदलला आहे. येवल्यातील विंचूर चौफुलीजवळ निदर्शने सुरू असल्याने त्यांनी आपल्या मार्गात बदल केला असून सकल मराठा समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना विरोध केला जात आहे. यातच भुजबळांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवले गेले आहेत. यातच ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ यांच्या गाड्याचा ताफा गेला. त्या रस्त्यावर मराठा समाजाकडून गो मुत्र शिपडून निषेध नोंदवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रपतीचा शनिशिंगणापुर दौरा, अन् त्याच देवाच्या मंदिरात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार, उपोषणाचा दिला इशारा
हेही वाचा…“हिंदूच्या शोभायात्रेत सहभागी झाला म्हणून दलित युवकाची हत्या”,SIT मार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी..! ललित पाटील प्रकरणाबाबत ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चौकशीचा बडगा
हेही वाचा…अद्वय हिरेंनंतर बंधू अपुर्व हिरेंच्याही विरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…वाद पेटला..! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक