मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द केल्याप्रकरणी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातच ठाकरे गटाकडून कोर्टात जामीनासाठी अर्ज करण्यात आला असून आज त्यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. यातच दत्ता दळवींना जामीन मिळाला नाही तर ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. यावरूनच आता भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांवर धक्कादायक आरोप केला आहे.
हेही वाचा…वाद पेटला..! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी भांडूप येथील इमारती खाली उभी असलेली दत्ता दळवी यांची गाडी फोडण्यात आली. यावरून आता ही गाडी राऊत बंधूंनी फोडली असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…रविकांत तुपकरांसमोर राज्य सरकार झुकलं, ७० ते ८० टक्के मागण्या मान्य, १५ दिवसांची दिली मुदत
दरम्यान, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी दत्ता दळवी यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. यातच जामीन न मिळाल्यास, महामार्ग रोखून धरू अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आलीय. यातच दत्ता दळवी यांना संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्याकडून त्रास दिला जात आहे. अन् दत्ता दळवी यांची गाडी राऊत बंधूंच्याच कार्यकर्त्यांनी फोडली असल्याचा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भुजबळांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे, स्वत: च्याच मतदारसंघात ‘भुजबळ गो बॅंक’च्या घोषणा, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…राष्ट्रपतीचा शनिशिंगणापुर दौरा, अन् त्याच देवाच्या मंदिरात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार, उपोषणाचा दिला इशारा
हेही वाचा…“हिंदूच्या शोभायात्रेत सहभागी झाला म्हणून दलित युवकाची हत्या”,SIT मार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी..! ललित पाटील प्रकरणाबाबत ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चौकशीचा बडगा
हेही वाचा…अद्वय हिरेंनंतर बंधू अपुर्व हिरेंच्याही विरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा