चिपळून : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे फुलाचं कामकाज सुरू असताना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. कोसळेलेला पुलाचा भाग अद्यापही तसाच असून पुलाचा भाग काढण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सूरू असून आराखड्याला मंजूरी मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू केले जाणार आहे. यातच आता या पुलाची पाहणी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…मोठी बातमी..! ललित पाटील प्रकरणाबाबत ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चौकशीचा बडगा
कोकण दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी कोसळलेल्या पुलाची पाहणी केली. पुल कोसळ्याबद्दल राज्यातील घटनाबाह्य सरकारने एक चकार शब्दही काढला नाही. संबंधित कंत्राटदारावर कारवाईही झालेली नाही. यातच मुंबईतील मेगा रस्ते घोटाळ्यातील ९८० कोटीचे कंत्राट मिळालेला कंत्राटदार हाच आहे, असे समजते. लोकशाही आणि राज्य घटनेचे सर्व नियम पायदळी तुडवून महाराष्ट्राची सत्ता बळकावणाऱ्या भ्रष्ट राजवटीशी आपला लढा चालु ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…अद्वय हिरेंनंतर बंधू अपुर्व हिरेंच्याही विरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही मुंबई महापालिकेतील मेगा रस्ते घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर एका कंत्राटदाराची हकालपट्टी करण्यात आली. पण ना त्याला दंड झाला. ना तो ब्लॅकलिस्ट झाला. गेल्या वर्षभरात मुंबई महापालिका प्रशासकांनी भ्रष्ट कामांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग उभारणी हा देखील एक मेगा घोटाळा आहे. हा प्रकल्प म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाचा न संपणारा प्रकल्प असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…वाद पेटला..! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
यातच या रस्त्यावर करण्यात आलेले काॅंक्रीटीकरण अतिशय वाईट दर्जाचे असून रस्त्याचा पृष्ठभाग आणि लेव्हल इतकी असमतोल आहे की, ही एनएचएआयसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. इतका उघड भ्रष्टाचार खपवून घेणारे धोरण कोणाचे? मला यात राजकारण करायचे नाही. मात्र, हा पूल कोसळल्याची चौकशी का झालेली नाही? त्यावर कारवाई का केलेली नाही? या कंत्राटदाराच्या वाईट कामानंतरही त्याला मुंबईतील इतके मोठे कंत्राट कसे मिळाले? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केलाय.
कोकण दौऱ्यावर असताना मी, बांधकामादरम्यान कोसळलेल्या चिपळूण पुलाची देखील पाहणी केली.
आश्चर्य म्हणजे, हा पूल कोसळल्याबद्दल राज्यातील घटनाबाह्य सरकारने एक चकार शब्दही काढला नाही. संबंधित कंत्राटदारावर कारवाईही झालेली नाही.
विशेष म्हणजे, मुंबईतील मेगा रस्ते घोटाळ्यातील ९८० कोटीचे… pic.twitter.com/14Ob7fU0iR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ‘याठिकाणी’ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण,” कार्यक्रमाची जय्यत तयारी
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींची गाडी राऊत बंधूंनीच फोडली, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
हेही वाचा…भुजबळांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे, स्वत: च्याच मतदारसंघात ‘भुजबळ गो बॅंक’च्या घोषणा, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…राष्ट्रपतीचा शनिशिंगणापुर दौरा, अन् त्याच देवाच्या मंदिरात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार, उपोषणाचा दिला इशारा
हेही वाचा…“हिंदूच्या शोभायात्रेत सहभागी झाला म्हणून दलित युवकाची हत्या”,SIT मार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी