मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या संविधानात नमुद असणाऱ्या नियमावलीनुसारच पक्षांतर्गत सर्व निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यात कुठेही उल्लंघन झालेलं नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षांतर्गत सर्व निवडणुकांमध्ये अजित पवार व प्रफुल्ल पटेल या सर्वांनी पुर्णपणे सहभाग घेतला होता. कधीच कुठला विरोध केला नाही. कधीही आक्षेप घेतला नाही. परंतु २० वर्ष निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतल्यानंतर आज त्यांच्याकडून झालेल्या निवडणुका या चुकीच्या असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाचे चिन्ह व नावासंदर्भात सुनावणीशी निवडणुका झाल्या की नाही याचा दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे विनाकारण अजित पवार गटाकडून चुकीची माहिती अयोगासमोर मांडली जात आहे. असं शरद पवार गटाने सांगितलं आहे.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ‘याठिकाणी’ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण,” कार्यक्रमाची जय्यत तयारी
अजित पवार गटाकडून आमच्या पक्षाला म्हणणं मांडायला आणखी अमूक इतके दिवस लागतील आणि समोरच्यांचं म्हणणं अमूक इतक्या दिवसात मांडून होईल आणि अमूक इतक्या दिवसात निवडणूक आयोगाचा निर्णय येईल. अशाप्रकारे अंदाज बांधून सुनावणीची चूकीची माहिती पत्रकार परिषदांद्वारे सांगितली जात असून जनतेची दिशाभूल केली जात आहे. अजित पवार गटाची ही कृती अतिशय चुकीची आणि निषेधार्थ असून अशाप्रकारे अंदाज बांधणी करू नये असे निवडणुक आयोगाकडून अजित पवार गटाला सांगण्यात आले आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींची गाडी राऊत बंधूंनीच फोडली, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळ किंवा लोकसभा व राज्यसभा या अशा कुठल्याही विधिमंडळांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर पक्ष संघटनेतील संख्याबळही निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून स्पष्ट झालं आहे. असंही शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर थू तुमच्या जिंदगानीवर”, प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“अजितदादा भेकड नाही तर मग याची उत्तरं द्या,” शरद पवार गटाचे अजित पवार गटाला ‘१०’ तिखट सवाल
हेही वाचा…संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट, तर्क वितर्कांना उधाण
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक, नाशकातील दौरा भुजबळांनी अर्धवट का सोडला ? छगन भुजबळ म्हणाले..,
हेही वाचा…चिपळूनच्या पुलाचा भाग कोसळला, तोच कंत्राटदार, आदित्य ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा