अहमदनगर : श्री. क्षेत्र शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यावधीचा भ्रष्ट्रचार व अनधिकृत कामगार भरती, अनधिकृत बोगस विश्वस्त मंडळ बरखास्त करून त्वरीत प्रशासकाची नेमणूक केली जावी यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे व अशोक टेमके इत्यादी जण उपोषणाचा बगडा उचलला आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी भेट देऊन अधिवेशन संपेपर्यंत उपोषण थांबवण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला समोर, भाजपला मोठा धक्का, काॅंग्रेसने उसंडी मारली
ऋषिकेश शेटे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात काही लोकप्रतिनिधींचा देखील उल्लेख केला आहे. माजी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अनधिकृत भरती केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच शनी शिंगणापुर देवस्थान येथे दर्शन पावतीमध्ये २ कोटींचा भ्रष्ट्राचार करून अनेक खाजगी शिक्षम संस्था घेतल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून ताबडतोब प्रशासक नेमणूक करण्यात यावी. तसेच बोगस कामगार भरती, याची चौकशी करून समितीची नेमणूक करण्यात यावी, यातच श्री शनिश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम २०१८ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…“..त्यामुळे विनाकारण अजित पवार गटाकडून चुकीची माहिती अयोगासमोर मांडली जातेय,” शरद पवार गटाचा आरोप
शनेश्वर देवस्थानचा वापर फक्त राजकीय पुढाऱ्यांसाठी होत असून याठिकाणी हजारो कोटींचा भ्रष्टाचार सुरू आहे. बांधकामामध्ये २० कोटी रूपये मंजूर होऊन यात ७ कोटी रूपयाचा खर्च होऊनही बांधकाम अपुर्ण आहे. यातच काही प्रस्थापित राजकारण्यांची स्वत: ची शनेश्वर नावाने शिक्षण संस्था असून भाविकांकडून देणग्या घेतल्या जात आहेत. एक कोटी मुकूट दागिने नेत्याच्या घरी जातात. ७० ते ८० लाख रूपये खर्चून रूग्णावाहिका विकत घेतल्या जातात अन् दुसऱ्याच दिवशी त्याचा लिलाव होऊन फक्त ९० हजार रूपयात विकून स्वत: च्या शिक्षण संस्थेला वापरली जाते. धर्मादाय कार्यालयाने मागील काही वर्षापासून आवाहन दिलंय की, सदर देवस्थान चुकीची निवदने काढून पैसे लाटले जातात. अस उपोषण कर्ते ऋषिकेश शेटे पाटिल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, एकही संस्थानाचा पैसा गैरमार्गाने खर्च होऊ नये, हा शुद्ध आणि पवित्र उपक्रमाला मदत करणं गरजेचं असून ती आपली जबाबदारी आहे. या सर्व प्रकाराची उच्च स्तरीय दखल घेण्याची विनंती करणार. तसेच हिवाळी अधिवेशनापुरता उपोषण थांबावता आलं तर थांबवा. अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावे, परमेश्वराच्या मंदिरात कुणीही गैरव्यवहार करू नये. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“मंत्री छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी, सलग १२ मॅसेज पाठवून..,” राजकारण तापणार
हेही वाचा…मावळसाठी मीच उमेदवार असणार !श्रीरंग बारणेंनी जाहीर केली उमेदवारी, भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय ?
हेही वाचा…शिरुरसाठी आंबेगाव ‘किंगमेकर’ : दोन दोस्त ठरवणार कोण होणार खासदार?
हेही वाचा…“..तर त्यांना भाजप तुकडे फेकणार नाही,” नितेश राणेंचा ‘बाडगा’ उल्लेख करत सुनील राऊतांची जहरी टिका
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस अन् बीआरएसमध्ये काटे की टक्कर, शिंदेंनी भाजपसाठी प्रचार केला, भाजपला किती जागा ? एक्झिट पोल आला समोर