मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द केल्याप्रकरणी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातच ठाकरे गटाकडून कोर्टात जामीनासाठी अर्ज करण्यात आला असून आज त्यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. यातच दत्ता दळवींना जामीन मिळाला नाही तर ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. यावरूनच आता भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांवर धक्कादायक आरोप केला आहे. त्यावर सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट, तर्क वितर्कांना उधाण
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी भांडूप येथील इमारती खाली उभी असलेली दत्ता दळवी यांची गाडी फोडण्यात आली. यावरून आता ही गाडी राऊत बंधूंनी फोडली असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर भाजपने आमच्यावर भुंकण्यासाठी काही बागडे ठेवले आहेत. ते जर आमच्यावर भुंकले नाही, आरोप केले नाही तर त्यांना भाजप तुकडे फेकणार नाही. असा हल्लाबोल सुनील राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे.
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक, नाशकातील दौरा भुजबळांनी अर्धवट का सोडला ? छगन भुजबळ म्हणाले..,
त्याच्यावर बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. ज्यांनी दहा पक्ष फिरून आले आहेत. त्यांना कोणीही किमंत देऊ नका. असा घणाघात देखील सुनील राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर लगावला आहे. पोलिस प्रशासन दबावाखाली काम करतांना दिसत आहे. काल भांडूपमध्ये शिवसैनिक गेले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गैरवर्तन केले. तसेच आमचे सरकार आले तर या सरकारमधील ९० टक्के मंत्री तुरूंगात जातील असा इशारा देखील सुनील राऊत यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस अन् बीआरएसमध्ये काटे की टक्कर, शिंदेंनी भाजपसाठी प्रचार केला, भाजपला किती जागा ? एक्झिट पोल आला समोर
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला समोर, भाजपला मोठा धक्का, काॅंग्रेसने उसंडी मारली
हेही वाचा…“..त्यामुळे विनाकारण अजित पवार गटाकडून चुकीची माहिती अयोगासमोर मांडली जातेय,” शरद पवार गटाचा आरोप
हेही वाचा…“तर थू तुमच्या जिंदगानीवर”, प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“अजितदादा भेकड नाही तर मग याची उत्तरं द्या,” शरद पवार गटाचे अजित पवार गटाला ‘१०’ तिखट सवाल