मुंबई : मराठा आरक्षणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे. यातच काल येवल्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तर आज कर्जत येथील पक्षाच्या शिबिराच्या वेळी देखील विरोध करण्यात येत आहे. यातच त्यांना सलग १२ मॅसेज पाठवून धमकी देण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे विनाकारण अजित पवार गटाकडून चुकीची माहिती अयोगासमोर मांडली जातेय,” शरद पवार गटाचा आरोप
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विविहासाठी छगन भुजबळ गेले असता. त्याठिकाणी काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांना फोन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यावर छगन भुजबळांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सलग १२ मॅसेज पाठवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळच वळण लागले आहे.
हेही वाचा…“तर थू तुमच्या जिंदगानीवर”, प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौदागर सातनाक नामक व्यक्तीच्या क्रमांकावरून धमकी आल्याचा तक्रारदार घोडके यांनी दावा केला आहे. शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मावळसाठी मीच उमेदवार असणार !श्रीरंग बारणेंनी जाहीर केली उमेदवारी, भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय ?
हेही वाचा…शिरुरसाठी आंबेगाव ‘किंगमेकर’ : दोन दोस्त ठरवणार कोण होणार खासदार?
हेही वाचा…“..तर त्यांना भाजप तुकडे फेकणार नाही,” नितेश राणेंचा ‘बाडगा’ उल्लेख करत सुनील राऊतांची जहरी टिका
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस अन् बीआरएसमध्ये काटे की टक्कर, शिंदेंनी भाजपसाठी प्रचार केला, भाजपला किती जागा ? एक्झिट पोल आला समोर
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला समोर, भाजपला मोठा धक्का, काॅंग्रेसने उसंडी मारली